esakal | शुभमंगल पण सावधानच! कोरोनामुळे यंदाही विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण
sakal

बोलून बातमी शोधा

0vevaha_20F_0

दिवाळी होऊन पंधरा दिवसांनी म्हणजेच तुळशीचे लग्न उरकताच लगीनघाईस प्रारंभ होतो. यंदा कार्तिकी एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी आली असून, शुक्रवारपासून (ता २७) विवाह मुहूर्त सुरू झाली आहेत.

शुभमंगल पण सावधानच! कोरोनामुळे यंदाही विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण

sakal_logo
By
भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : दिवाळी होऊन पंधरा दिवसांनी म्हणजेच तुळशीचे लग्न उरकताच लगीनघाईस प्रारंभ होतो. यंदा कार्तिकी एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी आली असून, शुक्रवारपासून (ता २७) विवाह मुहूर्त सुरू झाली आहेत. दरम्यान, अजून लस आली नसल्याने कोरोना धास्तीने ना वऱ्हाडी, ना बॅन्डबॅजा साध्या पद्धतीने लग्न उरकून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे आनंदवर विरजण येणार असून, शुभ मंगल पण सावधानच हे चित्र असणार आहे.


दाते पंचागानुसार गौण आपत्कालीन मुहूर्त दिली आहेत. चातुर्मासासह गुरू शुक्र अस्त काळात विवाह मुहूर्त असले तरी मुख्य कालीन विवाह सोहळ्यास प्राधान्य दिलेले असताना गौण आपत्कालीन मुहूर्तदेखील पंचांगात दर्शविला आहे. दरम्यान, यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोठ्या हौसेने होणाऱ्या लग्नाला ब्रेक लागणार आहे. मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत शुभ मंगलम, सावधान उरकून घ्यावे लागणार आहेत. मात्र, मुलीच्या पित्याला हुंडा, मानपान अशा रितीरिवाजाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, आपल्या मुलीचे मोठ्या हौसेने लग्न करण्यात कोरोनाने पूर्णविराम दिला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार मोजक्याच वऱ्हाडी मंडळींत विवाह सोहळे उरकून घ्यावे लागणार आहेत.

असे आहेत विवाह मुहूर्त
३० नोव्हेंबर, ७, ८, १७, १९, २३, २४, २७ डिसेंबर, ३, ५, ६, ७, ८, १० जानेवारी, १५, १६ फेब्रुवारी, २२, २४, २५, २६, २८, २९, ३० एप्रिल, १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ मे, १६, १९, २०, २६, २७, २८ जून, १, २, ३, १३ जुलै ही मुख्यकालीन मुहूर्ते तर आपत्कालीन मुहूर्तात १८, २०, २१, २२ नोव्हेंबर, १८, १९, २०, २१, २४, २५, ३० जानेवारी, १, २,३, ४, ८, २१, २२, २६, २७, २८ फेब्रुवारी, २, ३, ५, ७, ९, १०, १५, १६, ३० मार्च, १, ५, ६, ७ एप्रिल अशी विवाह मुहूर्त दाते पंचांगानुसार दाखवली आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

loading image