Corona Breaking ; हिंगोलीने कोरोनाने त्रिशतकाचा आकडा गाठला, तीन नव्याने पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

वसमत येथील क्वारंटाइन केलेल्या नव्याने तिघांना कोरोनाची बाधा झाली असून दोन पुरुष व एक महिलेचा यात समावेश आहे. नांदेड येथे एका महिलेवर उपचार सुरू असून तिच्या संपर्कातील दोन्ही व्यक्ती आहेत.

हिंगोली : वसमत येथील क्वारंटाइन केलेल्या नव्याने तिघांना कोरोनाची बाधा झाली असून दोन पुरुष व एक महिलेचा यात समावेश आहे. नांदेड येथे एका महिलेवर उपचार सुरू असून तिच्या संपर्कातील दोन्ही व्यक्ती आहेत. तर मंगळवारी प्राप्त अहवालानुसार सहा रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी मंगळवारी (ता.सात) दिली. दरम्यान, वसमत येथील क्वारंटाइन सेंटर येथून सहा रुग्ण बरे झाले आहेत. यात मन्नास पिंपरी एक, ताक तोडा एक, केंद्रा बु. एक, लिंग पिंपरी दोन तर पुन्हा वसमत येथील सहा असे एकूण अकरा रुग्ण बरे झाले आहेत. यात तीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, अकरा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व त्यांचे सहकारी एकूण ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर परिवहन कार्यालयातील दहा अधिकारी, कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यल्यातील दहा अहवालापैकी नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल राखीव आहे? त्याचा थ्रोट स्वॅब परत तपासणीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे तीनशे रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २६३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आजघडीला ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Video - परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तरच लॉकडाउनचा निर्णय 

सेंटरनिहाय उपचार सुरू असलेले रुग्ण 
जिल्हा आयसोलेशन वॉर्ड येथे सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात रिसाला एक, मकोडी एक, बहिर्जी दोन, गांधी चौक दोन, एक जीएमसी नांदेड यांचा समावेश आहे. तसेच वसमत डेडीकेटेट येथे अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात वसमत शहर एक, बहिर्जी नगर दोन, गणेशनगर एक, दर्गा पेठ एक, रिधोरा एक, टाकळगव्हाण दोन, शुक्रवार पेठ दोन, जय नगर एक यांचा समावेश आहे. तर कळमनुरी येथे सात कोरोना सेंटर येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये भाबळी एक, विकास नगर दोन, नवी चिखली तीन, डिग्रस एक आदींचा समावेश आहे. लिंबाळा येथे सात रुग्णांवर उपचार सुरु असून यात तलाब कट्टा एक, केंद्रा दोन, प्रगती नगर एक, भांडेगाव दोन, पिंपळखुटा एक, आदींवर उपचार सुरू आहेत. तसेच सेनगाव येथे केंद्रा येथील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर औंढा येथे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात दोन औंढा, भोसी दोन यांचा समावेश आहे.

हेही वाचा - नांदेड तहसीलच्या पथकाने वाळू माफियांच्या आवळल्या मुसक्या

४११ जणांचे अहवाल येणे बाकी 
जिल्ह्यात आयसोलेशनवॉर्ड व सर्व कोरोना सेंटर आणि गाव पातळीवर एकूण पाच हजार ३७७ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी चार हजार ७०४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चार हजार ५३१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ८३९ रुग्णांना भरती करण्यात आले असून, ४११ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यानी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking; Hingoli hit a three-wicket haul with Corona, three new positives, hingoli news