esakal | Corona Breaking ; हिंगोलीच्या कोरोनाबाधित तरुणीचा अकोल्यात मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

mukta

हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा खूर्द येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा कोरोनाच्या आजारामुळे उपचारादरम्यान अकोला येथे उपचारादरम्यान बुधवारी (ता.२४) मृत्यू झाला. यानंतर तिच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती हिंगोली जिल्हा प्रशासनाने दिली.    

Corona Breaking ; हिंगोलीच्या कोरोनाबाधित तरुणीचा अकोल्यात मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्ह्यातील केंद्रा खूर्द येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा कोरोनाच्या आजारामुळे उपचारादरम्यान अकोला येथील शासकीय वैद्यकीय संस्था येथे बुधवारी (ता.२४) मृत्यू झाला. दरम्यान, सदरिल तरुणीला मधूमेह असल्याने सुरवातीला वाशिम येथे व नंतर अकोला येथे उपचारासाठी दाखल केले होते. याबाबत जिल्हा प्रशासन हिंगोलीच्या वतीने गुरुवारी (ता.२५) रात्री साडेआठ वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी प्रेसनोट काढून माहिती दिली. दरम्यान, या रुग्णाची नोंद आकडेवारीत जिल्हा प्रशासनाकडे नाही. मात्र, जिल्ह्यातील रुग्ण असल्यामुळे याची माहिती अहवालात देण्यात आली. 

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात राष्‍ट्रवादी पडळकर यांच्या वक्‍तव्याविरोधात आक्रमक

बुधवारी आले होते तीन रुग्ण 
जिल्ह्यात बुधवारी (ता.२४) रात्री साडेआठ वाजता आलेल्या अहवालात तीन रुग्ण वाढले आहेत. यामध्ये एक १८ वर्षीय तरुण, तर अन्य दोन महिला असून ज्यांची वय १८, ५५ आहेत. १८ वर्षीय तरुण हिंगोलीतील तलाबकट्टा येथील रहिवासी असून तो निलंगा (जि.लातूर) येथून आला आहे. तर दोन्ही महिला मुंबईहून हिंगोलीत परतल्या आहेत. त्या दोघीही मुळच्या हिंगोलीतील रहिवासी आहेत. तसेच दिवसभरात पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.

हेही वाचा - रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा... 

बुधवारी पाच जण कोरोनामुक्त 
आयसोलेशन वॉर्ड जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील तीन तर वसमत येथील एक आणि एसआरपीएफचा एक जवान असे पाच जण बुधवारी (ता.२४) कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुट्टी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २५१ झाली आहे तर २२९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या २२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, तसेच विनाकारण घराबाहेर फिरु नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 


हिंगोली जिल्हा कोरोना मीटर 
एकूण पॉझिटिव्ह - २५१ 
उपचार सुरु - २२ 
उपचार घेत घरी परतलेले - २२९
मृत्यू - शून्य 

loading image