esakal | Corona Breaking ; परभणीत चोवीस तासात सोळा पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यात दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे परभणीत शनिवारी दुपारी तीनपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल १६ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आता खऱ्या अर्थाने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजाता आलेल्या अहवालात दिवसभरात सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Corona Breaking ; परभणीत चोवीस तासात सोळा पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः परभणीकरांनो आता खऱ्या अर्थाने सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या पाच दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (ता.दहा) एकाच दिवशी सहा रुग्ण आढळून आले तर एकाच दिवसात मागील चोवीस तासात एकूण १६ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणादेखिल खडबडून जागी झाली आहे. विशेष म्हणजे यात परभणी शहरासह, सेलू शहर, जिंतूर व मानवत तालुक्यातील आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

हेही वाचा - कोरोनाग्रस्तांचे मनोबल वाढवा, कोण म्हणाले ते वाचा...

सेलूत ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचारी कोरोना बाधित
सेलू ः स्टेट बँक ऑफ इंडिया जवाहर रोड सेलू येथील ग्राहक सेवा केंद्रात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना बाधित म्हणून प्राप्त झाला आहे. सेलू येथे गणेश नगर भागात राहत असले तरी (ता.१५) जून पासून त्यांची पत्नी चिकलठाणा येथे गेल्यामुळे ते त्यांच्या बँकेतील दोन सहकाऱ्यांसोबत मारोती नगर सेलू येथे राहत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेतील एक कर्मचाऱ्याचा अहवाल (ता.पाच) जूलै रोजी कोरोना बाधित असल्याचे जिल्हा स्तरावरून माहिती प्राप्त झाली होती. सदरील रुग्ण परभणी येथे एक खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. सदरील कर्मचारी विष्णूनगर परभणी येथे वास्तव्यास आहे. (ता.२७) जूनला सेलू बँकेत शेवटच्या दिवशी आले होते आणि ते आजारी पडल्याने (ता.२७) जूननंतर शाखेत आले नाहीत. बँकेत त्यांचा (ता.२७) आणि त्या पूर्वीही बँकेत कामानिनित्त संबंध आल्याने (ता.१६) अधिकारी कर्मचाऱ्यांना हॉटेल गोविंदामध्ये विलगिकरण करण्यात आले होते. 

हेही वाचा - वीज दरवाढी विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक, परभणीत निदर्शने...

चारही रुग्णांची प्रकृती चांगली
तीन जणांचे अहवाल (ता.सात) जूलै कोरोना बाधित असल्याने त्यांना कोरोना केअर सेंटर सेलू येथे भरती करण्यात आले आहे. ह्या तिघांचे स्वॅब कोरोना बाधित आल्याने उर्वरित १३ बँकेतील कर्मचारी व दोन इतर असे १५ स्वॅब (ता.सात) जूलै रोजी  पाठविण्यात आले होते. १५ पैकी सात अहवाल आज प्राप्त झाले असून त्यापैकी मारोती नगर सेलू येथील एक कर्मचारी कोरोनाबाधित आला आहे. त्यास कोरोना केअर सेंटर सेलू येथे भरती करून उपचार चालू करण्यात आले आहेत. चारही रुग्णांची प्रकृती चांगली आहे. 

परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - २००
आजचे पॉझिटिव्ह - १६
उपचार सुरू - ८३
उपचार घेत घरी परतले - १११
एकूण मृत्यू - पाच 
आजचे मृत्यू - शून्य
-----------------
(संपादन ः राजन मंगरुळकर)