esakal | Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात दिवसभरात बारा पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. परभणीत शनिवारी दुपारी तीनपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी बारा नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आता खऱ्या अर्थाने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. 

Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात दिवसभरात बारा पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः शहरासह जिल्ह्यात दिवसभर एकामागे एक वेगवेगळ्या तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी (ता.११) एकाच दिवशी बारा रुग्ण आढळून आले. आरोग्य यंत्रणादेखिल सध्या खडबडून जागी झाली आहे. विशेष म्हणजे यात परभणी शहरासह, सेलू शहर, गंगाखेड तालुक्यातील रुग्ण आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
हेही वाचा - नांदेडला शनिवारी तिघांचा मृत्यू;११ जण पॉझिटिव्ह

तीन जण कोरोनामुक्त 
परभणी शहर आणि तालुक्यातील तीन जण शनिवारी कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये परभणी शहरातील दोघे तर एक जण झरी येथील आहे. सद्यस्थितीत ११४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा - माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

सेलूत कोरोना बाधित रूग्ण वाढीची मालिका सुरू
सेलू ः सेलू शहरातील व तालुक्यातील कोरोना बाधित रूग्ण संख्येत दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीने आरोग्य विभागासह प्रशासन वाढत्या कोरोना बाधितांच्या मालिकेने हादरले आहे. शुक्रवारी (ता.दहा) रात्री शहरातील रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचारी व इतर एक अशा दोघांचा कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान, तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या वालूर गावातील रहिवासी असलेले एक पन्नास वर्षीय व्यक्ती परभणीत जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी काही दिवसांपूर्वी दाखल होते. शनिवारी (ता.११) दुपारी वालूर येथील व्यक्तीचा कोरोना पाॅझिटीव्ह अहवाल आल्याने शहरासह तालुक्यातील आरोग्य विभाग व प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

गंगाखेडला स्वागत समारंभाच्या आयोजकावर गुन्हा 
गंगाखेड: कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या कुटुंबातील स्वागत समारंभास लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकारी, पत्रकार व व्यापाऱ्यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे अस्वस्थता पसरली आहे. या ठिकाणी एका स्वागत समारंभाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना शनिवारी (ता.११) घडली. सदरील समारंभ विनापरवानगी झाला असून यातुनच शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाल्याने प्रशासन जागे झाले. लग्न समारंभानिमित्त स्वागत समारंभाचे आयोजन करणारे व्यापारी राधेशाम भंडारी यांच्यावर गंगाखेड पोलिस स्टेशन येथे तलाठी चंद्रकांत साळवे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
 
परभणी जिल्हा 
एकूण बाधित - २१२
आजचे पॉझिटिव्ह - १२
आजचे मृत्यू - शून्य 
उपचार सुरू - ९३
बरे - ११४
एकूण मॄत्यू - पाच

(संपादन ः राजन मंगरुळकर)

loading image