esakal | कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह स्मशानातून थेट नगरपंचायतीसमोर; आष्टीतील धक्कादायक प्रकार 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg
  • बीड जिल्ह्यातील आष्टी येथील धक्कादायक प्रकार. 
  •  ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायतीच्या असमन्वयामुळे अंत्यसंस्कारासाठी तीन तास प्रतिक्षा. 

कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह स्मशानातून थेट नगरपंचायतीसमोर; आष्टीतील धक्कादायक प्रकार 

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड) : आष्टी ग्रामीण रुग्णालयात निधन झालेल्या कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कारासाठी वेळेवर कर्मचारी उपलब्ध नसल्याने तिचा मृतदेह स्मशानातून थेट नगरपंचायत कार्यालयासमोर आणण्याचा धक्कादायक प्रकार आष्टी शुक्रवारी (ता. सहा) रात्री घडला. ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायतीच्या असमन्वयामुळे सुमारे तीन तास प्रतिक्षा करावी लागली. यानंतर रात्री उशिरा या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील 65 वर्षीय महिलेला आजारी असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सकाळी उपचारांसाठी आणण्यात आले होते. रुग्णालयात आणल्यानंतर या महिलेची अन्टीजेन चाचणी केली असता अहवाल कोरोना पॅझिटिव्ह आला. अहवाल आल्यानंतर अवघ्या तासाभरातच दुपारी तीनच्या सुमारास या महिलेचे निधन झाले. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धतीनुसार ग्रामीण रुग्णालयाने नगरपंचायत प्रशासन प्रशासनाला कळविले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वैद्यकीय पथकाने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मृतदेह पिंपळेश्वर मंदिराजवळील स्मशानभूमीत नेला. तेथे महिलेचे दोन-तीन नातेवाईक नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते. परंतु, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपंचायतचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने वैद्यकीय पथकाचा खोळंबा झाला.

स्मशानभूमीत सुमारे दोन तास हा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत राहिला. परंतु, नगरपंचायतीचे कोणीही न आल्याने व घरीही मृतदेह नेता येत नसल्याने वैद्यकीय पथकाने नातेवाइकांच्या संमतीने मृतदेह दोन तासांनंतर म्हणजे रात्री साडेआठ वाजता नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ठेवला. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. मग, मृतदेहाच्या अंत्यसंस्काराबाबत पावले उचलत कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. तरीही या कार्यवाहीला सुमारे एक तास लागला. नंतर रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


मृतदेहाची अवहेलना झाल्याने नातेवाइक संतप्त
 
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येत नाही. त्यावर प्रशासनातर्फे अंत्यसंस्कार करण्यात येतात. परंतु, नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याने मृतदेह स्मशानात दोन तास व नगरपंचायत कार्यालयासमोर एक तास पडून होता. स्मशानातून मृतदेह नगरपंचायतीत आणावा लागल्याने मृतदेहाची प्रचंड अवहेलना झाली. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नातेवाइक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. आमच्या कुटुंबातील सदस्याच्या या अवहेलनेला जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.


नगरपंचायत कर्मचा-यांकडून अंत्यविधीसाठीची सर्व व्यवस्था सायंकाळी साडेपाच वाजता करून ठेवण्यात आलेली होती. मृतदेह स्मशानभूमीत नेत असल्याबाबत ग्रामीण रुग्णालयाकडून कोणताही निरोप आला नाही. निरोप मिळाला असता तर तेथे कर्मचारी पाठविता आले असते. ग्रामीण रुग्णालयातील अधिका-यांकडून प्रत्येकवेळी नगरपंचायतीकडे बोट दाखविले जाते. - नीता अंधारे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, आष्टी


कोरोनाबाधीत महिलेच्या मृतदाची विल्हेवाट लावण्याबाबतचे पत्र नगरपंचायतीला देण्यात आल्यानंतर त्यांनी व्यवस्थाही केली होती. मात्र, कर्मचारी तेथे हजर नसल्याने आणि नातेवाईक संतप्त झाल्याने आम्ही घाबरून प्रेत नगरपंचायत येथे आणले. 
डॉ. राहुल टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आष्टी

(संपादन-प्रताप अवचार)