Corona Update: चिंताजनक! बीड जिल्ह्यात २४ तासांत २४१ रुग्ण

दोन मृत्यूंची नोंद; बीड तालुक्यातही वाढले रुग्ण
corona
coronacorona

बीड: Beed Corona updates: कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरायचे नाव घेत नाही. रोजच रुग्णसंख्या कायम असणाऱ्या जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) कोरोनाने चांगलीच उडी घेत अडीचशेची संख्या (२४१) गाठण्याचा प्रयत्न केला. आता बीड तालुक्यातही रुग्णसंख्या वाढल्याने चिंता कायम आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सर्वत्र ओसरत असताना जिल्ह्याची रुग्णसंख्याही टप्प्या-टप्प्याने कमी झाली. मात्र, कधी शंभराच्या घरात पोचलेली संख्या पुन्हा वाढून दीडशे ते दोनशेंच्या घरात पोहोचली. जिल्ह्यात तपासण्यांची संख्या अधिक असली तरी अधूनमधून पॉझिटिव्हिटी रेटही उसळी घेत पाचच्या पुढे आणि सहा टक्क्यांच्या घरात पोहचत आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत रुग्णसंख्या घटत असताना जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या तीन आकडी कायम आहे. नगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढलेली असून जिल्ह्यातील गेवराई, आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या तालुक्यांच्या काही भागांचा नगरशी संपर्क आहे. त्यामुळे या तालुक्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज बांधत काही दिवसांपूर्वी या तालुक्यांत कोरोना प्रतिबंधक निर्बंध अधिक कडक करण्यात आले.

corona
लातूरात तृतीयपंथीयांसाठी कल्याण समितीची स्थापना

मात्र, त्याचाही फारसा परिणाम नसल्याचे दिसत आहे. अलीकडच्या काळात आष्टी तालुक्याची रुग्णसंख्या सर्वाधिक असे. परंतु, बुधवारच्या रुग्णसंख्येत सर्वाधिक ५० रुग्ण बीड तालुक्यातील आहेत. तर, आष्टी तालुक्यातही ४४ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी (ता. २७) तपासणीसाठी घेतलेल्या ५००९ स्वॅब नमुन्यांचे अहवाल बुधवारी हाती आले. यामध्ये २४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, ४७६८ स्वॅब नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये बीड ५०, आष्टी ४४, अंबाजोगाई पाच, धारुर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव पाच, परळी एक, पाटोदा ३३, शिरूर कासार ३९ आणि वडवणी तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे.

पाच तालुक्यांत वाढच; धारुरही थोडे अधिकच
बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई या पाच तालुक्यांत रुग्णसंख्या वाढतीच आहे. अलीकडे धारुर तालुक्यातही संख्या काहीशी वाढत आहे. वडवणी, माजलगाव, परळी व अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णसंख्या एक आकडी आहे.

corona
IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट

सक्रिय रुग्णही वाढू लागले-
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर भयंकर होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका दिवशी सर्वोच्च दीड हजार रुग्णसंख्या आढळली होती. तर, याच काळात एकाच दिवशी तब्बल १६ हजार रुग्ण जिल्ह्यात उपचाराखाली होते. मात्र, लाट ओसरत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या घटून हा आकडा नऊशेपर्यंत खाली आला होता. परंतु, अलीकडे नवे रुग्ण अधिक आणि कोरोनामुक्तांची संख्या कमी आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारीही नवे रुग्ण २४१ तर कोरोनामुक्तांची संख्या १७० होती. आता सक्रिय रुग्णांची संख्या १५४२ झाली आहे. मृत्यूंचे सत्रही कायम आहे. बुधवारी मागील २४ तासांतील दोन कोरोनाबळींची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात २५९६ कोरोनाबळींची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ९६ हजार ७१२ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यातील ९२ हजार ५७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com