दिवाळीच्या खरेदीवर कोरोना 'फ्री' !

आनंद खर्डेकर
Wednesday, 11 November 2020

दिवाळीच्या खरेदीत कोरोना 'फ्री' असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. कोरोना महामारीचा विसर जनतेला पडल्याचे बाजारपेठेतील गर्दीवरून अधोरेखीत झाले आहे.

परंडा (उस्मानाबाद) : दिवाळीच्या खरेदीत कोरोना 'फ्री' असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. कोरोना महामारीचा विसर जनतेला पडल्याचे बाजारपेठेतील गर्दीवरून अधोरेखीत झाले आहे. मागील काही महिन्यापासून कोरोना महामारीची दहशत गावोगावी आहे. प्रशासन सर्वस्तरावरून काळजी घेत आहे. अनेक शाळा महाविद्यालये बंद आहे. कारखाने ओस पडले आहेत. अनेक कर्मचारी अधिकारी, जीव धोक्यात घालीत कोरोना योध्याची भूमिका अहोरात्र बजावत आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना रुग्णांचा आकडा दररोज बदलत आहे. मात्र मागील काही दिवसापासून नागरिक बेजाबदारपणे वागत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. कापड, किराणा, रेडीमेड, स्वीट मार्ट, स्टेशनरी, सराफी दुकानात खरेदीसाठी नागरीक कुटुंबासह घराबाहेर पडले आहे. खरेदीच्या धावपळीत अनेक जण सुरक्षित आंतराचे पालन करीत नाहीत. अनेक लोक विना मास्क खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मागील काही महिन्यात कोणताच सण फारसा उत्साहाने साजरा करता आला नाही. त्यामुळे दिवाळीसाठी अनेक जण मोठी खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बाजारपेठेत होणारी गर्दी, सुरक्षिततेची काळजी न घेणारे बेजबाबदार नागरिक यामुळे पुन्हा कोरोनाची भिती वाढत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी थंडीचे वातावरणामुळे दुसरी लाट येण्याची भिती सर्वस्तरातून व्यक्त होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खरेदीवर मोठमोठया ऑफर, स्कीम दिलेल्या असतात. दिवाळी खरेदीवर काही वस्तू 'फ्री' देऊन ग्राहकांना आकर्षित केले जाते. बाजारपेठेतील गर्दी पाहून दिवाळीच्या खरेदीवर कोरोना 'फ्री ' असे धोकादायक चित्र पहावयास मिळत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona free on Diwali shopping crowded in market