esakal | कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही- आमदार डॉ. राहुल पाटील      

बोलून बातमी शोधा

file photo

शनिवार ( ता. 10)  एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही- आमदार डॉ. राहुल पाटील      
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत परभणी शहरात आणि जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटर्समधे स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागणीच्या प्रमाणात पुरवठा आदी बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला. 

शनिवार ( ता. 10)  एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डाॕ.विवेक नावंदर,  जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. कल्याण कदम, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीचे संचालक अरुण पाटील, अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

हेही वाचाआम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करु; नांदेडकरांनो गतवर्षीसारखे सहकार्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीतील परिस्थितीचा आढावा घेतला. परभणी शहरातील सरकारी आणि खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सोईंबाबत जाणून घेतले. रेमीडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व त्याची चढ्या भावात होणारी विक्री, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा, भोजन व्यवस्था, याबाबतीत यापुढे कुठलाही हलगर्जीपणा  खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही दिला. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दररोज संपर्कात असून या बाबतचे अपडेट दररोज मुख्यमंत्र्यांना देत असल्याचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या इतर शस्त्रक्रियेसाठी  लागणाऱ्या रक्तपुरवठ्या बाबतही या बैठकीत चर्चा झाली. रक्तदान करण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे यावे असेही आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आवाहन केले. कोरोना रुग्णांच्या चाचणीचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत असेही त्यांनी सुचवले.

संपादन- प्रल्हाद कांबळे