जालन्यात आठजण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी आठ जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी (ता. २९) दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जालना - कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी आठ जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी (ता. २९) दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर गुरुवारी (ता. २८) आधी तीस आणि रात्री उशिरा पुन्हा दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ११७ झाली आहे. सध्या रुग्णालयात ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. २८) ३२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बाधितांचा आकडा ११५ झाला. त्यामुळे जिल्ह्याभरात चिंतेचे वातावरण पसरले. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

दरम्यान, शुक्रवारी आठ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. या आठ रुग्णांमध्ये वडगाव वखारी (ता. जालना) येथील तीन, जाफराबाद तालुक्यातील टेभुर्णी येथील एक, नवीन जालना भागातील खासगी रुग्णालयातील दोन कर्मचारी व शहरातील साईनाथनगर येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड 

जिल्ह्यात आतापर्यंत ११७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात ३९२ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी ३९२ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 
यामध्ये जालना शहरातील संत रामदास हॉस्टेलमध्ये २९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २४, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात १७, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २१, पोलिस प्रशिक्षण केंद्रात १०९ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ३, जाफराबादमधील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये १४, तर टेंभुर्णीच्या राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे १२, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १५, तर शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २६ व्यक्ती अलगीकरणात आहेत. घनसावंगीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ४१, अल्पसंख्यांक गर्ल्स हॉस्पिटलमध्ये ४२, मॉडेल स्कूल मंठा येथे ३७ आणि बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात २ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna

Tags
टॉपिकस