जालन्यात सोळाजण कोरोनामुक्त

उमेश वाघमारे 
Thursday, 9 July 2020

जिल्ह्यात कोरोनाने चारजणांचा बळी गेला आहे. तर बुधवारी (ता. आठ) नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून १६ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना -  जिल्ह्यात कोरोनाने चारजणांचा बळी गेला आहे. तर बुधवारी (ता. आठ) नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून १६ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते; मात्र मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा आलेख काही प्रमाणात खाली आला आहे. बुधवारी (ता. आठ) १५ कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ८२८ झाली आहे. तर दुसरीकडे बुधवारी (ता. आठ) १६ कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा : जालन्यात आठ दिवसांमध्ये २७४ कोरोनाबाधित

दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत ३४ जणांचे बळी गेले आहे. यात बुधवारी (ता. आठ) चारजणांचा पुन्हा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील शेरसवारनगर येथील ५२ वर्षीय महिला, शंकरनगर येथील येथील ४० वर्षीय महिला, प्रयागनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, लोधी मोहल्ला येथी ४५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा :  जालना शहरात काटेकोर लॉकडाउन 

उपचारानंतर बुधवारी (ता. आठ) १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात मामा चौक, कन्हैयानगर, एमआयडीसी, काद्राबाद, दुखीनगर येथील प्रत्येकी एकजण, जुना जालना भागातील कसबा, गुरुगोविंदनगर येथील प्रत्येकी दोन, तर विणकर मोहल्ला येथील सातजणांना बुधवारी (ता. आठ) उपचार करून सुटी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात ५६५ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जालना जिल्ह्यात संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या ५६५ इतकी झालेली आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे दोन, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २५, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६५, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह येथे १६, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ५७, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४५, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ६६, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ६८, परतूर येथील केजीबीव्ही येथे १६, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे नऊ, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३८, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे तीन, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ३४, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १२, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत येथे ४०, जाफराबाद येथे पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १७, तर हिंदुस्थान मंगल कार्यालयात आठजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna