esakal | जालन्यात ४८ जण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

डाॅक्टरांनी केलेल्या उपचारानंतर ४८ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी आतापर्यंत एकूण ५६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालन्यात ४८ जण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. शुक्रवारी (ता. दहा) जिल्ह्यात ५६ कोरोनाबाधितांची भर पडली, तर दोनजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  दरम्यान, उपचारानंतर ४८ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी आतापर्यंत एकूण ५६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

शहरातील पेन्शनपुरा परिसरातील ६० वर्षीय महिलेला श्वसनाचा, न्यूमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे ता. सात जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. तिचा कोरोना चाचणीचा अहवाल ता. आठ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी (ता.दहा) मृत्यू झाला आहे. तर टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथील ५७ वर्षीय पुरुषाला न्यूमोनिया, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने ता. २७ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.दहा) त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ही ३७ वर गेली आहे. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

कोरोना चाचणीच्या शुक्रवारी (ता.दहा) प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ५६ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील कादराबाद येथील नऊ, साईनगर येथील चार, टेंभुर्णी येथील चार, जालना शहरातील क्रांतीनगर येथील तीन, सुवर्णकारनगर येथील तीन, अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील तीन, संभाजीनगर येथील दोन, गणपतीगल्ली येथील दोन, गवळीगल्ली येथील दोन, बरवारगल्ली, मिशन हॉस्पिटल रोड, एस.टी. कॉलनी, कांचननगर, आशीर्वादनगर, अंबड चौफुली परिसर, सदरबाजार, नूतन वसाहत, ग्रीन पार्क, जिल्हा सामान्य रुग्णालय, आनंदस्वामी गल्ली वॉर्ड, गोपीकिशननगर, रामनगर, कालीकुर्ती, ख्रिश्‍चन कॉलनी, प्रयागनगर, ढवळेश्वर, खवा मार्केट, अयोध्यानगर, अमरछाया टॉकीज परिसर, कन्हैयानगर, अमित हॉटेल, भोकरदन शहरातील नूतन कॉलनी, परतूर तालुक्यातील शिंगोणा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २७९ जणांवर उपचार सुरू असून २९ कोरोनाबाधितांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर केले आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू असलेले ४८ कोरोना बाधित रुग्ण शुक्रवारी (ता.दहा) कोरोनामुक्त झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात शहरातील तलरेजा बाजार येथील १५, अग्रसेननगर, पेंशनपुरा मोदीखाना येथील प्रत्येकी तीन, मूर्तीवेस, श्रीकृष्णनगर येथील प्रत्येकी दोन, इन्कम टॅक्स कॉलनी, कादराबाद, रामनगर, लक्ष्मीकांतनगर, सुभद्रानगर, आर.पी. रोड, पाणीवेस, जिल्हा सामान्य रुग्णालय, कोठारीनगर, एस.टी. कॉलनी, गोपाळपुरा, चंदनझिरा, नयाबाजार, बरवारगल्ली, नहाबी कॉलनी, अंबड तालुक्यातील एकलहेरा, रोहिलागड, सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड, तसेच टेंभुर्णी, भोकरदन येथील कैलास मंगल कार्यालय येथील प्रत्येक एकजण असे ४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ५८८ जण अलगीकरणात 

जिल्ह्यात ५८८ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे तीन, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५४, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह येथे सात, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ५७, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे तीन, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे ६५, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे ९८, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे ९१, परतूर येथील केजीबीव्ही येथे नऊ, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे नऊ, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २५, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १३, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २०, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सहा, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १२, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३४, जाफराबाद पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १८, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चार जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)