esakal | जालना जिल्ह्यात चौदाशे जण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार १७३ जण कोरोनाग्रस्त झाले, यापैकी तब्बल एक हजार ४०० जण उपचाराअंती बरे झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता.३०) ७५ कोरोनाग्रस्तांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे,

जालना जिल्ह्यात चौदाशे जण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार १७३ जण कोरोनाग्रस्त झाले, यापैकी तब्बल एक हजार ४०० जण उपचाराअंती बरे झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता.३०) ७५ कोरोनाग्रस्तांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, सध्या ७०६ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. गुरुवारी ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये जालना शहरातील संभाजीनगर येथील दहा, आरपी रोड येथील पाच, मनीषानगर येथील तीन, समर्थनगर, विणकर कॉलनी, परतूर शहर व भोकरदन शहर येथील प्रत्येकी दोन, देहेडकरवाडी, पाणीवेस, लोधी मोहल्ला, दुर्गामाता रोड, अकोले (ता. जालना), पिवळा बंगला, नागेवाडी, रामनगर पोलिस कॉलनी, राममंदिर परिसर, चंदनझिरा, इंदिरानगर, ख्रिश्चन कॉलनी, विद्यानगर, आवलगाव (ता. घनसावंगी) येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ४०० जण बरे झाले आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

कोरोनाग्रस्तांचा मृत्यू थांबण्यास तयार नाही. जालना शहरातील जवाहर बाग येथील रहिवासी असलेल्या ८० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे बुधवारी (ता. २९) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर देऊळगाव राजा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे गुरुवारी (ता.३०) मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात ५७३ जणांचे संस्‍थात्‍मक अलगीकरण 

जिल्ह्यातील ५७३ जणांना गुरुवारी (ता.३०) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सात, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे पाच, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे नऊ, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ६७, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे १८, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे १६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे ५१, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे दोन, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे १०१, गुरुगणेश भवन येथे ५९, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे १८, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे १५, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १३, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४३, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ७६, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पाच, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे दोन, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २१, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे दहा, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे एक, आयटीआय कॉलेज येथे एक, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाच, जिजाऊ इंग्रजी शाळा येथे २१, राजमाता जिजाऊ इंग्रजी शाळा येथे पाचजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)