जालना जिल्ह्यात ७२ जण कोरोनामुक्त 

उमेश वाघमारे 
Saturday, 22 August 2020

डाॅक्टरांच्या उपचारांमुळे ७२ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी आतापर्यंत तब्बल दोन हजार ६३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना -  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यू थांबण्यास तयार नाही. शुक्रवारी (ता.२१) जालना शहरातील संभाजीनगर येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ११४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे, तर आतापर्यंत तीन हजार ९६१ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यातील ७२ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी आतापर्यंत तब्बल दोन हजार ६३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार २१४ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

जालना कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

सुखद बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता.२१) तब्बल ७२ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये खासगाव येथील १२ जण, जालना शहरातील कन्हैयानगर येथील सहाजण, पिंपळगाव व आष्टी येथील प्रत्येकील पाचजण, किनगाव येथील चारजण, घनसावंगी येथील तीन, जालना शहर, गोकुळधाम, रामनगर, भाटेपुरी, मेरा (ता. जाफराबाद) व वडीगोद्री येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील एसआरपीएफ, लक्कडकोट, कादराबाद, आरपी रोड, मस्तगड, रेल्वेस्टेशन, आनंदवाडी, सोनलनगर, माळीपुरा, चंदनझिरा, अंबड तालुक्यातील अंकुशनगर, धाकलगाव, चांगलेनगर, घाटवी, देऊळगावराजा, पाष्टा, सेलगाव, देवपिंपळगाव, गुरुपिंपरी, कारेगाव, आडगाव, बदनापूर, परतूर शहरातील मोंढा, रामेश्वरगल्ली, तळणी (ता. मंठा) येथील प्रत्येकी एकजण अशा एकूण ७२ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ६३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार २१४ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

जिल्ह्यातील ४२५ जणांना शुक्रवारी (ता. २१) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे १९ जण, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे १४ जण, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २४ जण, वनप्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे २५ जण, राज्य राखीव पोलिस बल गट क्वार्टर सी ब्लॉक येथे सात जण, परतूर येथील मॉडेल स्कूल येथील २१ जण, केजीबीव्ही ४४ जण, मंठा येथील केजीबीव्ही येथे २९ जण, मॉडेल स्कूल येथे १४, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३२ जण, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २१ जण, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३० जण, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३१ जण, भोकरदन शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ५१ जण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ५१ जण, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे ११ जण, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे एकजणास संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna