अंबडला तिघे कोरोना पॉझिटिव्ह

बाबासाहेब गोंटे
Sunday, 24 May 2020

अंबड शहरातील वंजारगल्ली, नाईकवाडी मोहल्ला येथील एकजण कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील तिघांचे घनसावंगी मार्गावरील वलखेडा फाटा येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहामध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.  जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर  तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अंबड (जि.जालना) -  शहरातील वंजारगल्ली, नाईकवाडी मोहल्ला येथील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याचबरोबर येथील कोरोनाबाधितांची संख्या चारवर पोचली आहेत. हे चौघेही एकाच कुटुंबातील आहेत. 

अंबड शहरातील वंजारगल्ली, नाईकवाडी मोहल्ला येथील एकजण कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील तिघांचे घनसावंगी मार्गावरील वलखेडा फाटा येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहामध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.  जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर  तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या तिघांमध्ये एक पुरुष,एक महिला व चार वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

या तिघांना यापूर्वीच क्वारंटाईन कक्षात ठेवल्याने त्यांचा वंजारगल्ली, नाईकवाडी मोहल्ला येथे कोणाशी संपर्कही आला नसल्याचे अंबडचे तहसीलदार राजीव शिंदे व अंबड जिल्हा उपरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगन्नाथ तलवाडकर यांनी सांगितले. दरम्यान, आणखी तिघे कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासन अधिक दक्षता बाळगत आहे.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

दरम्यान, व्यापारी महासंघाने सोमवारपासून (ता.२५)सलग तीन दिवस अंबड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

शहरात पुन्हा चोख पोलिस बंदोबस्त

 शहरातील  वंजारगल्ली, नाईकवाडी मोहल्ला या भाग पोलिसांनी अगोदरच सीलबंद केलेला आहे. आता पुन्हा एकदा अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी.शेवगण व पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागासह शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Ambad