जालन्यात पुन्हा दोन पॉझिटिव्ह

महेश गायकवाड
Saturday, 23 May 2020

जिल्ह्यात शनिवारी (ता.२३) पुन्हा दोन नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ५४ झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक नवीन जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी असून दुसरा रुग्ण मुंबईवरून जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे आला होता.

जालना -  जिल्ह्यात शनिवारी (ता.२३) पुन्हा दोन नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ५४ झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक नवीन जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी असून दुसरा रुग्ण मुंबईवरून जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे आला होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी आठ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्यावर गेली. त्यात शनिवारी पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

यातील एक जालना शहरातील नवीन जालना भागातील खासगी हॉस्पिटलचा कर्मचारी आहे, येथील दोन डॉक्टर व सहा कर्मचारी यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आले आहे. दुसरा रुग्णाचा मुंबई प्रवासाचा इतिहास असून तो जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे आला होता.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

आतापर्यंत ५४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यांपैकी १० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या रुग्णालयात ४४ जणांवर उपचार सुरू आहेत.

 • जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले रुग्ण 
 • ६ एप्रिल : दुखीनगरमधील ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिला बाधित (ता. १५ मे रोजी सुटी) 
 • २१ एप्रिल : शिरोडा (ता. परतूर) येथील महिला (ता. २९ एप्रिलला सुटी) 
 • १ मे : पारध (ता. भोकरदन) येथील सतरावर्षीय युवती (ता. १५ मे रोजी सुटी) 
 • २ मे : परतूर तालुक्यात मुंबईहून आलेला युवक.  
 • २ मे : मालेगावच्या बंदोबस्तावरून परतलेले चार जवान. (१४ मे रोजी सुटी) 
 • १० मे : कानडगाव येथे (ता. अंबड) मुंबईवरून आलेले दोघे. 
 • १० मे : इंदेवाडी परिसरातील गर्भवती. ( ता.२१ मे रोजी सुटी) 
 • ११ मे : जिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका ( ता.२१ मे रोजी सुटी) 
 • ११ मे : राज्य राखीव दलातील एक जवान 
 • १२ मे : राज्य राखीव दलातील एक जवान 
 • १३ मे : मुंबईहून रामनगरकडे परतणारा युवक, राज्य राखीव दलातील एक जवान व परतूर येथील एक व्यक्ती. 
 • १४ मे : कोविड हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर. (ता.२१ मे रोजी सुटी) 
 • १५ मे : खासगी हॉस्पिटलचा डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी व पेवा (ता. मंठा) येथे मुंबईहून आलेली महिला व राज्य राखीव दलातील चार जवान. 
 • १७ मे : खासगी हॉस्पिटलमधील दोन कर्मचारी, घनसावंगीतील पीरगॅबवाडी येथील सहा व रांजणी येथील एक, अंबड- कानडगाव येथील एक. 
 • १८ मे : नूतनवाडी येथील अकरावर्षीय मुलगा. 
 • १९ मे : जालना शहरातील खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व अंबड तालुक्यातील शिरनेर येथे मुंबईवरून परतलेली एक व्यक्ती. 
 • २० मे : मुंबईवरून सिद्धेश्‍वर पिंपळगावात परतलेल्या एका कुटुंबातील तिघे. 
 • २२ मे : जुना जालना भागातील हॉस्पिटलमधील चार, नवीन जालना परिसरातील हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, राज्य राखीव दलातील एक जवान, पेवा (ता.मंठा) येथील एक, टेंभुर्णी (ता.जाफराबाद) येथे मुंबईवरून परतलेली एक महिला. असे आठजण. 
 • २३ मे : नवीन जालन्यातील खासगी हॉस्पिटलचा कर्मचारी, मुंबईवरून जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे आलेला व्यक्ती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna