जालन्यात कोरोनाची एकसष्टी 

महेश गायकवाड
Monday, 25 May 2020

जिल्ह्यात रविवारी पुन्हा सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बधितांची संख्या ६१ झाली आहे. दरम्यान, दोन जवानांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

जालना - जिल्ह्यात रविवारी (ता. २४) पुन्हा सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बधितांची संख्या ६१ झाली आहे. दरम्यान, दोन जवानांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

नव्याने बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अंबड शहरातील ३२ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, चारवर्षीय मुलाचा समावेश असून, ते एकाच कुटुंबातील आहेत. तर उर्वरित तीन रुग्णांमध्ये नवीन जालना परिसरातील खासगी रुग्णालयातील महिला कर्मचारी, पुष्पकनगर परिसरातील ५९ वर्षीय पुरुष; तसेच व मानेगाव (ता. जालना) येथील ४६ वर्षीय पुरुष असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

राज्य राखीव पोलिस दलातील दोन जवानांच्या दुसऱ्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दोघांनाही १४ दिवस क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६१ कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी १५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ४६ जणांवर उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna

Tags
टॉपिकस