जालन्यात आठ जणांना कोरोनाची बाधा

उमेश वाघमारे 
Thursday, 28 May 2020

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.२७) नव्याने आठ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, यात एक १२ वर्षांची मुलगी आणि शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जालना -  जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.२७) नव्याने आठ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, यात एक १२ वर्षांची मुलगी आणि शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

परिणामी जालन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ८५ वर गेली आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२७) चारजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

मुंबई येथून परतलेल्या कोरोनाबाधित एका मुलास मुलीच्या संपर्कात आलेली नूतनवाडी येथील ५५ वर्षीय एका महिलेचा अहवाल बुधवारी (ता.२७) पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर चांदई एक्के येथील ३६ वर्षीय पुरुष व १२ वर्षीय मुलगी या दोघांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील एका खासगी रुग्णालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच छत्तीसगड येथून परतलेल्या खापरदेव हिवरा येथील तरुणाचा अहवालही बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. तर पिरगॅबवाडी येथील ४२ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

कोरोनाबाधित झालेले चारजण उपचारानंतर बुधवारी (ता.२७) कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यात राज्य राखीव दलाचे तीन जवान व अंबड तालुक्यातील कानडगाव येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. 

आतापर्यंत २२ जणांना सुटी

जिल्ह्यात आतापर्यंत ८५ जण कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचार सुरू असून, उपचारानंतर आतापर्यंत २२ जण कोरोनामुक्त झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna