जालन्याच्या संभाजीनगरात ३६ जणांना कोरोनाचा संसर्ग 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना - शहरात मागील अकरा दिवसांपासून कडकडीत लॉकडाउन असतांना देखील कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. गुरूवारी (ता.१६) जिल्ह्यात तब्बल ८० कोरोना बाधित रूग्णांची भर पडली आहे, यात संभाजीनगरातील ३६ जणांचा समावेश आहे. तर उपचारादरम्यान दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल ५१ जणांचे बळी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही एक हजार १८२ वर जाऊन पोहचली आहे. 

जालना शहरात सध्या सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यामुळे जालना शहरात ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजेपासून कडकडीत लॉकडाउन लागू आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी ३८८ जणांचे कोरोना चाचणीचे आहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात २९५ जण निगेटिव्ह आले. १३ जणांचे अहवाल हे बाद झाले आहेत.

गुरुवारी तब्बल ८० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात शहरातील संभाजीनगर येथील तब्बल ३६ जण कोरोना बाधित निघाले आहे. तर लक्कडकोट येथे सहा, मस्तगड येथे पाच, पाणीवेस, हिरखान रोड, नेहरू रोड येथे प्रत्येकी दोन जण, रूख्मिणीनगर चार, पोलिस गल्ली, पुष्पकनगर येथे प्रत्येकी तीन, तट्टुपरा, आनंदीस्वामी गल्ली, नाला जालना, खडकपुरा, मोदीखाना, संजयनगर, मित्तलनगर, दुःखीनगर, गोकुळविहार, अंबर हॉटेल परिसर, कालीकुर्ती, लक्ष्मीनगर, बुऱ्हाणनगर, निमलनगर, चंदनझिरा येथील सत्यनारायणनगर, शंकर नगर, सिद्धीविनायकनगर येथे प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. 

शहरातील मिल्लतनगर येथील ६० वर्षीय पुरूषाचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना श्वसनासह उच्च रक्तदाब, मधुमेह व न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १२ जुलै रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शहरातील दुखीनगर येथील ४४ वर्षीय महिलेला श्वासनाचा व न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. गुरूवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण ५१ जणांचा बळी गेला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत ७२७ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. यात गुरूवारी (ता.१६) बारा जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये काद्राबाद येथील तीन, नाथबाबागल्ली, मंगळबाजार, रोहिला गल्ली, मस्तगड, इतवारा मोहल्ला, बुंदेले चौक, कडबीपुरा, सकलेचानगर, झाशीची राणी चौक येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ५२२ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ५२२ जणांना बुधवारी (ता.१५) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ६४, गुरू गणेश भवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४९, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे एक, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे २६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे १०७, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे ५४, परतूर येथील केजीबीव्ही येथे सात, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे आठ, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पाच, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३४, बदनापुर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १०, घनसवांगी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १२, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदूस्थान मंगल कार्यालय येथे पाच जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com