जालन्यात बाधितांमध्ये ३२ जणांची भर

उमेश वाघमारे 
Thursday, 23 July 2020

जिल्ह्यात बुधवारी (ता. २२) जालना शहरातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत ५६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर रात्री ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोरोनाबधितांची एकूण संख्या ही एक हजार ५८० झाली आहे.

जालना -  जिल्ह्यात बुधवारी (ता. २२) जालना शहरातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत ५६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर बुधवारी रात्री ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोरोनाबधितांची एकूण संख्या ही एक हजार ५८० झाली आहे. दरम्यान, २८ जणांनी उपचारानंतर कोरोनावर विजय मिळविला आहे. त्यामुळे आतापर्यंत ९४० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी बुधवारी सांगितले आहे. यात शहरातील संभाजीनगर येथील ६९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर शहरातील विणकर कॉलनी येथील ७३ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी (ता. २१) रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा ३२ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजार ५८० झाली आहे. यापैकी ९४० जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जालना शहरातील २७, तर ग्रामीण भागातील एक असे एकूण २८ जण बुधवारी कोरोनामुक्त झाले आहेत. यात शहरातील संभाजीनगर येथील दहा, पाणीवेस, अयोध्यानगर, काद्राबाद, इतवारा मोहल्ला येथील प्रत्येकी दोन, वाढकेश्वर मंदिर परिसर, खडकपुरा, कन्हैयानगर, पुष्पकनगर, राज्य राखील बल जवान, लक्कडकोट, क्रांतीनगर, चंदनझिरा, कसबा, जालना तालुक्यातील पीरकल्याण येथील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल ९४० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ८०८ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ८०८ जणांना बुधवारी (ता. २२) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०२, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३१, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १६६१, गुरुगणेश भुवन येथे १, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ८०, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ४४, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ६९, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ४२, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ३४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे १२, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ४१, अंबड येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४५, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २६, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सात, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ६२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २३, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १४, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे सहा जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna

Tags
टॉपिकस