जालन्यात कोरोनामुळे १११ जण बाधित

उमेश वाघमारे 
Monday, 17 August 2020

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून रविवारी (ता.१६) १११ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ६०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जालना - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून रविवारी (ता.१६) १११ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ६०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात ६३ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत दोन हजार २९३ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर १०८ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेली असून, सध्या एक हजार २०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रत्येक दिवशी शंभरी पार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी (ता.१६) जिल्ह्यात तब्बल १११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात भोकरदन शहरातील देशमुख गल्ली येथील १२, देऊळगावराजा येथील चारजण, जालना शहरातील दुःखीनगर, कचेरी रोड, शाकुंतलनगर, एक खासगी रुग्णालय, सहकार बँक कॉलनी, साईनगर, व्यंकटेशनगर, सदर बाजार, संजयनगर, रामनगर पोलिस कॉलनी, कचरेवाडी, कवठा (ता.जालना), अंबड शहरातील राजपूत मोहल्ला, बुलडाणा, मंठा शहरातील बाजार रोड, किनगाव, हसनाबाद, घाटोळी, सिंदखेडराजा, लालवाडी, बावणे पांगरी, भिलपुरी, पास्टा येथील प्रत्येकी एकजण, अंबड शहरातील बाळानगर, पिंपळगाव रेणुकाई येथील प्रत्येकी दोनजण असे एकूण ४३ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे ६८ असे एकूण १११ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, रविवारी ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात जालना शहरातील नूतन वसाहत येथील सहाजण, खासगाव येथील पाचजण, नाथबाबा गल्ली व पाथरवाला येथील प्रत्येकी चारजण, आझाद मैदान, भोकरदन व साष्टपिंपळगाव येथील प्रत्येकी तीनजण, नवीन बाजार, सामान्य रुग्णालय निवासस्थान, सोनलनगर, भाग्यनगर, हातवन, मुरमा व आष्टी येथील प्रत्येकी दोनजण, समर्थनगर, लोधी मोहल्ला, कन्हैयानगर, योगेशनगर, आनंदनगर, चंदनझिरा, शोला चौक, वखारीनगर, गोपालनगर, सतकरनगर, जुना जालना, फत्तेपूर, देवपिंपळगाव, मसनापूर (ता. भोकरदन), मंठा, बुटखेडा, महाकाळा, शहागड, कंडारी, पराडा, बानेगाव येथील प्रत्येकी एकजण असे एकूण ६३ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna