esakal | औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच, चार हजार ५७२ जण आढळले पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

ग्रामीण भागामध्येही कोरोनासुराचे थैमान सुरूच असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केलेल्या ४८ हजार ५६२ चाचण्यांतून चार हजार ५७२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच, चार हजार ५७२ जण आढळले पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ग्रामीण भागामध्येही कोरोनासुराचे थैमान सुरूच असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केलेल्या ४८ हजार ५६२ चाचण्यांतून चार हजार ५७२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, यातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बुधवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगण्यात आले. 


जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. औरंगाबाद तालुक्यामध्ये १७ हजार ८८१ जणांची अँटीजेन, आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये १६६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 

एसटी कर्मचारी झाले हतबल; पुन्हा दोन महिन्याचे वेतन रखडले   

मोठ्या गावांत चाचण्या 
औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, कचनेर, करमाड, गाढेजळगाव, पिंप्रीराजा, वरझडी, सावंगी, भालगाव या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. वैजापूर तालुक्यामध्ये तीन हजार ७१८ जणांनी तपासणी करण्यात आली. त्यात ४०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. गारज, लासूरगाव, महालगाव, बोरसर, लाडगाव, वीरगाव, लोणी, खंडाळा, मानूर या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. 


सिल्लोड तालुक्यामध्ये तीन हजार ४२६ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४०५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. फुलंब्रीमध्ये दोन हजार ६८१ चाचण्यांपैकी २३७ पॉझिटिव्ह आढळून आले. नऊ जणांचा मृत्यू झाला. पाच मोठ्या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. 
सोयगाव तालुक्यात एक हजार ३०३ चाचण्या, २०३ पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू झाला. पैठणमध्ये पाच हजार ५८४ जणांचा चाचण्यांत ७७५ पॉझिटिव्ह, कन्नडमध्ये दोन हजार २२१ चाचण्यांत ५५८ पॉझिटिव्ह, १८ जणांचा मृत्यू झाला. रत्नपूरमध्ये एक हजार ५४६ चाचण्यांतून २४६ पॉझिटिव्ह, पाच मृत्यू तर गंगापूर तालुक्यात १९ हजार २०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात एक हजार ५७५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 


एमआयडीसीत सर्वाधिक रुग्ण  
एमआयडीसीतील रांजणगाव, शेणपुंजी या मोठ्या गावांमध्ये तीन हजार ४६ चाचण्या घेण्यात आल्या. त्या १०७५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. वाळूजमध्ये २३१४ टेस्ट, ९४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

(संपादन - गणेश पिटेकर)