जालन्यात कोरोनाचे दोन नवीन संशयित दाखल 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी (ता.२८) दोन नवीन संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. सध्या दाखल रुग्णाची संख्या चार असून, त्यांचा अहवाल लवकरच आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे. दरम्यान, अहवाल निगेटिव्ह आलेल्या ७६ जणांना आतापर्यंत सुटी देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी निवृत्‍ती गायकवाड यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आतापर्यंत एकूण १०९ रुग्‍ण दाखल होते. त्‍यापैकी ७६ रुग्‍णांच्या लाळेचे नमुने घेण्‍यात आले असून, त्‍यापैकी ६९ रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहे. त्यांना सुटी देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत विलगीकरण कक्षात चार रुग्ण दाखल असून, त्‍यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्‍णालयातून सुटी मिळालेल्या तसेच परदेश प्रवास करून आलेल्या सर्व व्‍यक्‍तींचे घरी अलगीकरण करण्‍यात आले आहे. 

आजपर्यंत एकूण १०९ परदेश प्रवास केलेल्या व्‍यक्‍तींपैकी १०७ व्‍यक्‍तीच्या घरीच अलगीकरण करण्‍यात आले आहे. तसेच इतर शहरे व राज्‍यातून आलेल्‍या ७४९ व्‍यक्‍तींचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्‍यात आले आहे. यासोबतच जिल्‍ह्यात एकूण १५ संस्‍था अलगीकरणासाठी निवडल्या असून, त्‍यामध्‍ये एक हजार ५३९ खाटांची व्‍यवस्‍था करण्‍यात आल्याची माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी निवृत्‍ती गायकवाड यांनी दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com