व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

3Corona test
3Corona test

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या आदेशानुसार प्रतिबंधक उपाय म्हणून 'ब्रेक द चेन' या मोहिमेअंतर्गत उमरगा शहरातील सर्व व्यापारी बांधवांचे व दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब अथवा अॅन्टीजेन चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान व्यापारी, कर्मचाऱ्यांना चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणी न करणाऱ्यांना दुकान उघडण्याची परवानगी रहाणार नाही, असे पत्र पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी काढले आहे.

शहरातील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारपासून (ता.१४) मंगळवार (ता.१८) पर्यंत पंचायत समिती सभागृहात सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चाचणी करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून विविध दुकानांसाठी चाचण्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवारी (ता.१४) किराणा व भुसार व पान मटेरिअल व्यापारी बांधव व कर्मचारी. शनिवारी (ता.१५) कापड व रेडीमेड व्यापारी व कृषी सेवा केंद्र, रासायनिक खते विक्रेते व कर्मचारी. रविवारी (ता.१६) सराफ व्यापारी व कर्मचारी, कारागीर, कर्मचारी व हॉटेल व चहा टपरीधारक. सोमवारी (ता.१७) जनरल स्टोअर्स, भांडी व्यापारी, मोबाईल विक्रेते, ऑप्टीकल दुकान व्यापारी, ऑटोमोबाईल व्यापारी हार्डवेअर आणि पेन्ट्स, फर्निचर, ईलेक्ट्रानिक, ईलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे व्यापारी व कर्मचारी. मंगळवारी (ता.१८) सलुन, फुटवेअर व्यापारी व कर्मचारी. या वेळापत्रकानुसार व्यापारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावयाची आहे.

मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर म्हणाले, शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने ही साखळी तोडण्यासाठी व सुरक्षिततेसाठी सर्व व्यापारी, कर्मचारी व कामगारांची चाचणी करण्याचे ठरवले आहे. चाचणी करणे बंधनधारक असून चाचणी केल्याशिवाय व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याची मूभा दिली जाणार नाही. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com