Corona Update : उदगीरात चौथ्या दिवशीही कोरोनाचा बळी, एकूण मृत्यूची संख्या दहावर 

corona death image.jpg
corona death image.jpg

उदगीर : उदगीर येथील कोविड रुग्णालयात सलग चौथ्या दिवशीही बुधवारी (ता. ८) पहाटे पाचच्या  सुमारास शहरातील दबीपुरा येथील एका ५५ वर्षीय व्यक्तिचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येथील कोरोना रुग्णालयात गेल्या चार दिवसापासून मृत्यू होण्याची शृंखला सुरू झाली आहे.

सलग चौथ्या दिवशीही उपचार घेत असलेल्या शहरातील दबीपुरा येथील एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी, रविवारी, सोमवारी व बुधवारी सलग चार रुग्ण दगावल्याने उदगीर शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या रुग्णाचा मंगळवारी सकाळी सहा वाजता स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यास मध्यरात्री रुग्णालयात दाखल केले असता पहाटे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात उदगीरात तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात नळगीर (ता.उदगीर) येथील एक दुकानदाराला लागण झाल्याचे समोर आले आहे. बिदर रोड वरील शिवनगर येथील एक तर दबीपुरा येथील मयत झालेला तिसरा रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस शहर व परिसरात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. टाळेबंदी शिथिल केल्याने बाजारपेठेत व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोका ही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवारी (ता.७) यशस्वी उपचारानंतर एकूण १३ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरी सोडण्यात आले. सध्या उदगीर तालुक्यातील एकूण ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उदगीरच्या कोविड रुग्णालयात सध्या अहमदपूर - १ , चाकूर - २ आणि हैदराबाद व मुंबई येथून पॉझिटिव्ह होऊन आलेले प्रत्येकी एक रुग्ण असे उदगीर बाहेरील पाच आणि उदगीरचे नऊ अशा एकूण १४ रुग्णावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com