Corona Updates: धक्कादायक! एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

काही दिवसांपूर्वी महापालिकेने 420 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली होती. याचा रिपोर्ट आल्यानतंर त्यात तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले

लातूर: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांतही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याचं दिसत आहे. लातूरमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.  लातूरमध्ये एकाच वसतीगृहात तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम कॉलेजच्या वसतीगृहातून हा प्रकार समोर आला आहे. वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबादचे 'मांझी'! समाजसेवेचे वेढ असणारे पंकज करतायत बोरी नदीचे...

काही दिवसांपूर्वी महापालिकेने 420 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली होती. याचा रिपोर्ट आल्यानतंर त्यात तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. सर्व बाधित विद्यार्थ्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.

हिंगोलीत विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई, पन्नास हजाराचा दंड वसूल

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू वाढले आहेत?
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लोकं बेफिकीर झाल्याचे दिसत होते. बरीच लोकं तोंडाला मास्क लावत नव्हते तसेच फिजीकल डिस्टंसही पाळत नव्हते. शाळा, कॉलेजेस सुरु झाल्याने गर्दी वाढू लागली होती. तसेच शासनाने बसेस, ट्रेन, लोकलही सुरु केल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणजे आज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Updates Shocking 40 students in the same dormitory corona positive in Latur