esakal | हिंगोलीत २४ केंद्रांतर्गत नऊ हजार जणांचे कोरोना लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात २४ ठिकाणी लसीकरण कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय कळमनुरी, औंढा, सेनगाव, वसमत, गोरेगाव ,मसोड, पोतरा, वाकोडी, आखाडा बाळापूर, डोंगरकडा यासह इतर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कक्ष स्थापन करण्यात आला आहे

हिंगोलीत २४ केंद्रांतर्गत नऊ हजार जणांचे कोरोना लसीकरण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही त्यावर प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता कोरोना प्रतिबंधित लस आल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत. गुरुवार (ता. चार) अखेर २४ कोविड लसीकरण आतापर्यंत नऊ  हजार १०१ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली असून गुरुवारी ८८९ जणांना लसीकरण करण्यात आल्याचे डॉ. इनायततुल्ला खान यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील दीड महिन्यापूर्वी कोविड प्रतिबंधित लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते सामान्य रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयात शुभारंभ झाला महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी ,पोलीस कर्मचारी, एस आरपीएफ जवान यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना  विविध आरोग्य संस्थेमार्फत  नोंदणी केलेल्याना प्रतिबंधित कोविड लस देण्यात आली.

जिल्ह्यात २४ ठिकाणी लसीकरण कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय कळमनुरी, औंढा, सेनगाव, वसमत, गोरेगाव ,मसोड, पोतरा, वाकोडी, आखाडा बाळापूर, डोंगरकडा यासह इतर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार ,डॉ.गोपाळ कदम , डॉ इनायत तुल्लाखान यांच्या मार्गदर्शनाखाली अधिपरीचारिका ज्योती पवार यांच्यासह इतर आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी लसीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.

जिल्ह्यातील २४ आरोग्य संस्थेच्या केंद्रांतर्गत आज पर्यंत ६७ आरोग्यकर्मचारी, ९१ इतर विभागातील कर्मचारी, याशिवाय विशेष म्हणजे ११४ जणांना दुसरा डोज लसीकरणाचा देण्यात आला आहे.तसेच ४५ ते ६० वर्षाखालील इतर आजार असणाऱ्या १५५ जणांना लसीकरण करण्यात आले. तसेच साठ वर्षावरील ५७४ जेष्ठ नागरिकांना लसीकरण केले . गुरुवारी  ८८९ जणांना लसीकरण केले आहे. आतापर्यन्त  नऊ हजार १०१  जनावर कोविड लसीकरण करण्यात आल्याचे डॉ. इनायततुल्ला खान यांनी सांगितले.कोरोना प्रतिबंधित लस घेतलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून सगळ्यांनी लस घ्यावी असे लस घेतलेल्या नागरिकांनी सांगितले.

जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सात दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदी काळात सर्व आस्थापना बंद असल्या तरी नागरिक बेफिकीर फिरत आहेत. संचारबंदीच्या काळात व्यापाऱ्यांच्या सरजू देवी विद्यालयात अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. तर बसस्थानकात देखील पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची अँटीजन तपासणी केली जात आहे. गुरुवारी बसस्थानकात १६२ प्रवाश्यांची तपासणी केली असता त्यात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यास आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी लिंबाळा येथील कोविड सेंटर येथे भरती करून उपचार सुरु केले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे