कोरोना लसच्या दुसऱ्या डोसकडे नागरिकांनी फिरवली पाठ

'ओमिक्रॉन हा विषाणू जिल्ह्यात फोफावू नये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शंभर टक्के लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

सेलू - 'ओमिक्रॉन हा विषाणू जिल्ह्यात फोफावू नये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शंभर टक्के लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सेलू तालुक्यात ५८ हजार ६१५ नागरिक अद्यापही दुसऱ्या डोसविना आहेत. प्रशासनाची झोप उडाली आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल या शुक्रवार ( ता.१०) पासून रविवार ( ता.१२ ) पर्यंत सेलू तालुक्यात तळ ठोकून राहणार आहेत. शहरातील तहसिल रोडवरिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात लसीकरण कॅम्पचे आयोजन केले आहे. तालुक्यात ग्रामीण भागात ७० हजार १५७, तर शहरात ३८ हजार ३२७ लसीकरणाचे लाभार्थी आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ६६ हजार ८१३, तर शहरी भागात ३२ हजार १४९ जणांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतला. पहिल्या डोसचे काम समाधानकारक आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांची ग्रामीण भागात ३३ हजार ४१२, तर शहरी भागात १६ हजार १५७ अशी संख्या आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसचे काम मात्र असमाधानकारक आहे. ५८ हजार ६१६ जणांना दुसरा डोस देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Corona Vaccination
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमची आज सभा; पाहा व्हिडिओ

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी याबाबीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाला लसीकरणासाठी तंबी दिली आहे. रविवारपर्यंत जिल्हाधिकारी आंचल गोयल या सेलू तालुक्यात राहणार आहेत. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी तहसिलदार दिनेश झांपले, पोलिस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर, बीईओ डी.डी. साबळे यांच्यावर कोरोना लसीकरण मोहिमेची जबाबदारी दिली आहे.

'कोरोना' ओमिक्राॅन या विषाणूची प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांच्या तालूका निहाय नियुत्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वत: सेलू तालुक्याची जबाबदारी स्विकारली आहे. परंतू सेलू शहरासह तालुक्यातील नागरिक ही बाब गांभिर्याने घेत नाहित. कोरोना लसिकरणा एैवजी माॅस्क, तोंडाला रूमाल बांधुन स्वत:ला हवे ते घेतांना शहरात बिनबोभाट फिरतांना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com