कोरोना योद्ध्यांना विमा कवच द्यावे- फौजिया खान

राज्य व केंद्र शासन निश्‍चितपणे प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. औषधी, ऑक्सिजन पुरवठा, दवाखाने, डॉक्टर, ईतर मनुष्यबळ मिळवुन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत होत आहे,
फौजीया खान
फौजीया खान

परभणी ः कोरोना विषाणूविरुध्दच्या या लढाईत काम करणार्‍या सर्व स्तरावरील कोरोना योद्ध्यांना राज्य व केंद्र सरकारने विमा कवच द्यावे व कोरोनाने मृत्यू पावलेल्या योद्ध्यांच्या (Death corona woriors) कुटुंबातील सदस्यांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान (Mp Fuojiya khan) यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिध्दीस पत्र दिले आहे. Corona warriors should be given insurance cover - Faujia Khan

राज्य व केंद्र शासन निश्‍चितपणे प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. औषधी, ऑक्सिजन पुरवठा, दवाखाने, डॉक्टर, ईतर मनुष्यबळ मिळवुन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत होत आहे. अशा या स्थितीत नागरिकांना देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. मानधन व रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी हे कोरोना महामारीच्या काळात कोरोना रोगाचे उपचार करणे, त्याचा संसर्ग वाढु नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजना करणे, नागरिकांना अन्नधान्य व ईतर आवश्यक सुविधा देणे याकरिता मोठ्या प्रमाणात काम करतात.

हेही वाचा- देवाला सोडलेल्या गायी चोरणाऱ्या टोळीला ग्रामस्थांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

मात्र त्यांना शासकीय, निमशासकीय व शासनाचे अंगीकृत उपक्रमात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचे प्रमाणे विमा कवच देण्यात येत नाही. त्यामुळे मानधन व रोजंदारीवर काम कारणार कर्मचारी तसेच आशा वर्कस, कोतवाल, पोलिस, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, पत्रकार, मृत रुग्णाचे अंतीम संस्कार करणारे कर्मचारी इत्यादी यांना 50 लाखाचे विमा कवच मिळालेच पाहिजे, असेही मत त्यांनी शुक्रवारी (ता. सात) प्रसिध्द केलेल्या एका निवेदनातून केले.

शासकीय, निमशासकीय व शासनाचे अंगकृती उपक्रमातील काम करणारे कर्मचारी अधिकारी आहेत. ते कोरोना महामारीच्या काळात प्रतीबंधक उपाय योजना करणे व कोरोना वरील उपचार करणे. यामध्ये योगदान देत आहेत. त्यांना या काळात कोरोना रोगाचा संसर्ग झाला. त्यामुळे मृत्यु आल्यास त्यांचे कुटुंबातील वारस म्हणून एका सदस्यास अनुकंपा तत्वावर तातडीने शैक्षणिक अर्हतानुसार त्या विभागाने विशेष बाब म्हणून नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी आपण पाठपुरावा करणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com