esakal | मेंदुविकार शिबीराला का वाटते कोरोनाची भिती...नक्की वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जगभरातील नागरिकांना ‘कोरोना’ची लागण होत आहे. त्यामुळे भारतातही या आजाराचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहेत.

मेंदुविकार शिबीराला का वाटते कोरोनाची भिती...नक्की वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी व जयवकील फाउंडेशन, बि जे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू’विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी ता. दोन ते ता. चार एप्रिल दरम्यान शहरातील नवा मोंढा भागातील आर. आर. मालपाणी मतीमंद विद्यालयात मेंदुविकार आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. परंतू कोरोनाच्या भीतीमुळे शिबिराच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

आरोग्य शिबिरासाठी नावनोंदणी
राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष रामनारायन काबरा, सचिव प्रकाश मालपाणी माहिती दिली आहे. एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेले हे शिबीर तूर्त स्थगित करण्यात आले असून, या साथरोग नियंत्रणानंतर पुन्हा या आरोग्य शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. या शिबिरासाठीच्या नावनोंदणीस प्रारंभ झाला असून प्रत्यक्ष नाव नोंदणी शहराच्या नवा मोंढा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात अथवा भ्रमणध्वनीद्वारेही नावनोंदणी करता येणार असल्याचे मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी दिली आहे.

हेही वाचा - पेमेंट अॅप वापरताय, तर व्हा सावधान

नऊ वर्षापासूनचा उपक्रम
गेल्या नऊ वर्षापासून आर. आर. मालपाणी मतीमंद विद्यालय परिसरात मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी ता. दोन ते ता. चार एप्रिल या कालावधीत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, जगभरात ‘कोरोना’चा प्रसार झाला असून हजारो जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक साथीचा आजार जाहीर केला आहे.

हेही वाचलेच पाहिजे - Video : निष्ठावंत आण्णा भाऊ साठेंना कम्युनिष्टांनीच असे खेचले मागे


शिबिर तात्पुरते रद्द
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात या साथीच्या रोगाचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातूनही रुग्ण येतात. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची आरोग्य शिबिरात मोठी गर्दी असते. या गर्दीमुळे ‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. यासाठी एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेले हे शिबीर तूर्त स्थगित करण्यात येत आहे.
- ओमप्रकाश गिल्डा, अध्यक्ष.