उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी

file photo
file photo

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोनाने तिसऱ्या रुग्णाचा सोमवारी सकाळी बळी घेतला. तीन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या शिराढोण (ता. कळंब) येथील ६५ वर्षाच्या महिलेचा सोमवारी (ता. एक) सकाळी आठच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये महिलेवर उपचार सुरु होते. या महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कसा झाला याची चिंता लागली होती, तिच्या घरातील सदस्यांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नेमकी बाधा कशी झाली याचे कोडं अजुनही उलगडले नाही.

तीन दिवसांपूर्वी या महिलेला उपचारासाठी उस्मानाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा स्वॅब अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे ही महिला गाव सोडून कुठेही गेलेली नव्हती.

लॉकडाऊनच्या काळात त्या फारशा बाहेरही फिरकल्या नव्हत्या. घरातील सदस्यांकडून रुग्णाच्या मागील प्रवासाची माहिती घेतली असता त्या बाहेर गेल्याचे नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्या नेमक्या कोणाच्या संपर्कात आल्याचे उत्तर अजुनही प्रशासनाला मिळालेले नाही. महिलेचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी महिलेच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शिराढोणमध्ये मुंबईवरुन आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागन झालेली होती. त्या महिलेवर लातुरात उपचार सुरु होते. सदर महिलेच्या सासुलाही बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी दोन जणांना कोरोनाची लागन झाली होती. रुग्णांची संख्या आता ७३ वर गेली असून, मृताची संख्याही तीनवर पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com