मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांवर बसमधून उतरवून फवारणी

latur news
latur news

उदगीर : मुंबई-पुणे येथून खाजगी ट्रॅव्हल्स, बसद्वारे उदगीर शहरात येणाऱ्या नागरिकांचे कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.शुक्रवारी (ता.20) शहरा बाहेरील नवीन शासकीय विश्रामगृहा समोर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या पथकाने बस थांबवून प्रवाशांना उतरवून ही कारवाई केली आहे.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उदगीर प्रशासनाने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर जवळपास शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली असून, तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, वस्तीगृहे, खाजगी शिकवण्या बंद करण्यात आल्या आहेत. बुधवारपासून शहरातील मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शुक्रवारी पहाटे साडेपाचपासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या पथकाने शहरात मुंबई-पुण्याहून दाखल होणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स, बसेस थांबून आतील प्रवाशांना उतरून त्यांना योग्य त्या सूचना देऊन, त्यांचे डेटॉलमिश्रित पाणी फवारून निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम राबवला. यावेळी जा प्रवाशांना काही त्रास असेल, सर्दी खोकला ताप येत असेल किंवा कोरोना संदर्भातील लक्षणे दिसत असल्यास तात्काळ सामान्य रुग्णालयात संपर्क साधावा स्वच्छता राखावी, काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला.

अचानकपणे ही मोहीम सुरु झाल्याने प्रवासात एकच खळबळ उडाली आहे. या मोहिमेसाठी नगरपालिकेतील काही अधिकारी-कर्मचारी, सामान्य रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते, शहरात गर्दी जमू नये कोरोना संदर्भात घाबरून जातात अधिक काळजी घ्यावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. ही मोहीम दररोज राबवण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्याधिकारी श्री राठोड यांनी सांगितले. 

अशाच आणखी महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com