esakal | आमदार ज्ञानराज चौगुले यांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus infection to Dnyanraj Chowgule

आमदार चौगुले हे चार महिन्यांपासून कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय काम करीत आहेत.

आमदार ज्ञानराज चौगुले यांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा-लोहारा तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचा गुरुवारी (ता. ३०) रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा आजार असल्याने उपचारासाठी मुंबईला निघाले आहेत. 

आमदार चौगुले हे चार महिन्यांपासून कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय काम करीत आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी त्यांनी प्रथम रॅपिड अँटीजेन चाचणी केली होती; मात्र ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी (ता.२८) त्यांनी स्वॅब दिल्यानंतर अहवाल इन्क्ल्युसिव्ह आला होता. पुन्हा गुरुवारी (ता. ३०) सकाळी स्वॅब दिल्यानंतर सायंकाळी उस्मानाबादच्या प्रयोगशाळेतील चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चौगुले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, मधुमेह असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रात्रीच स्वतःच्या वाहनातून उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
 
उमरग्यात तिसऱ्या दिवशी पुन्हा धक्का 
शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी आणखी वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णसंख्येचा आकडा वाढलेला असून, बुधवारी (ता. २९) रात्री आलेल्या अहवालात ३२ पॉझिटिव्ह आले आहेत.  यामध्ये काही व्यापारी, किराणा दुकानदार, हॉटेल मालकांचे नातेवाईक व पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा सहभाग आहे.

शहरातील २६ संख्या आहे. त्यात कोळीवाडा आठ, जुनी पेठ येथील पाच, काळे प्लॉट तीन, हमीदनगर दोन, पिस्के प्लॉट एक, शिंदे गल्ली एक, इंदिरा चौक एक, अजयनगर एक, उपजिल्हा रुग्णालय एक, भारत विद्यालय एक, पोलिस ठाण्याजवळ एक, महादेव गल्ली एक तर ग्रामीणमधून तुरोरी तीन, कोरेगाव एक, व्हंताळ एक, दाबका येथील एक असे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, मंगळवारी घेतलेल्या १७७ स्वॅबपैकी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी पाठविलेल्या तब्बल २०२ स्वॅब चाचणीचा अहवालही धक्कादायक येण्याची शक्यता आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
 
महिनाभरात रुग्णसंख्या झाली २४८ 
बुधवारी रात्री आलेल्या ३२ पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमुळे महिनाभरातील संख्या २४८ झाली आहे. शहरातील १९१, तर ग्रामीणमधील ५७ संख्या झाली असून महिनाभरात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
एका ज्येष्ठ संशयिताचा मृत्यू 
आळंद (कर्नाटक) तालुक्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा बुधवारी (ता. २९) कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 


(संपादन : विकास देशमुख) 
 

loading image