coronavirus - चोरट्या मार्गाने आलेल्यासह आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

महंतटाकळी (ता. गेवराई) येथील तपासणीसाठी स्वत:च दाखल झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यासह जिल्ह्यातील इतर सात जणांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. 

बीड - चोरट्या मार्गाने जिल्ह्यात आलेला आणि सर्दी, श्वसनास त्रास आदी लक्षणे असलेला महंतटाकळी (ता. गेवराई) येथील तपासणीसाठी स्वत:च दाखल झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यासह जिल्ह्यातील इतर सात जणांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. 
सोमवारपर्यंत (ता. १३) जिल्हा कोरोनामुक्तच होता. पिंपळा (ता. आष्टी) येथील कोरोग्रस्तावर नगरला उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून १२९ स्वॅबची तपासणी करण्यात आली. सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये दुबार तपासणी केलेल्या स्वॅबचाही समावेश आहे. गेवराई तालुक्यातील महंतटाकळी येथील एक व्यक्ती चोरट्या मार्गाने ता. पाच एप्रिल रोजी औरंगाबादहून जिल्हा हद्दीत आला. त्यापूर्वी काही दिवस त्याचे औरंगाबादेत वास्तव्य होते.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

त्याला सर्दी, खोकल्यासह श्वसनाचा त्रास होता. त्यावर त्याने खासगी डॉक्टरांकडेही उपचार केले; परंतु आजार बरा होत नसल्याने तो स्वत:हून शनिवारी रात्री उशिरा नातेवाइकांसह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात आला. त्याची लक्षणे पाहून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून हा अहवाल निगेटिव्ह आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच अहवाल निगेटिव्ह 
यापूर्वी पिंपळा (ता. आष्टी) येथील दोघांच्या स्वॅबची तपासणी नगरच्या जिल्हा रुग्णालयात होऊन एकाला कोरोना आढळला. तर जिल्ह्यातून आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातून ९६, तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून ३३ स्बॅब तपासणीसाठी पाठविले. परदेशातून आलेला एकजण सध्या होम क्वारंटाइन असून बाहेरजिल्ह्यातून आलेल्यांपैकी ५२ जर होम क्वारंटाइन आहेत. तर संस्थात्मक होम क्वारंटाइन असलेल्यांची संख्या १०५ आहे. सध्या विलगीकरण कक्षात केवळ दोघे आहेत. 

 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus - Negative reports of eight people