esakal | लातूरकरांना दिलासा! सातही जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

खबरदारीचा उपाय म्हणून या सातही व्यक्तींचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे लगेच पाठविण्यात आली. अहवाल येईपर्यंत सर्व संशयीत रूग्णास त्यांच्या राहत्या घरात जिल्हा निगराणी कोरोना समितीच्या  देखरेखीखाली हस्तांतरीत  करण्यात आले होते.

लातूरकरांना दिलासा! सातही जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सर्वोपचार रुग्णालयात दाखल झालेल्या सात संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

त्यामुळे लातूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नाही आणि सध्या संशयित रूग्णसुद्धा नाहीत, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी शनिवारी दिली. दरम्यान, सातही संशयित रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

कोरोना आजाराची काही लक्षणे आढळून आल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेत एकाच कुटूंबातील 7 संशयित रूग्णांना जिल्हा निगरानी कोरोना समिती यांच्यामार्फत या संस्थेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीसाठी शुक्रवारी (ता. १३) आणण्यात  आले होते. या संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी या संशयित रूग्णांचे विलगीकरण केले व त्यांची तपासणी केली. पण, आजाराची सर्व लक्षणे आढळून आली नाहीत.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

खबरदारीचा उपाय म्हणून या सातही व्यक्तींचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे लगेच पाठविण्यात आली. अहवाल येईपर्यंत सर्व संशयीत रूग्णास त्यांच्या राहत्या घरात जिल्हा निगराणी कोरोना समितीच्या  देखरेखीखाली हस्तांतरीत  करण्यात आले होते.

दरम्यान, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा अहवाल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेला शनिवारी प्राप्त झाला. त्यात या सर्व संशयीत रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल समजल्यानंतर संबंधीत रूग्णांबरोबरच वैद्यकीय तज्ज्ञ आणि नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई या भागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने लातुरातही नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. अनेकजन मास्क किंवा रूमाल बांधूनच घराबाहेर पडत आहेत. पण भीती बाळगू नका, योग्य ती काळजी घ्या, असा सल्ला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने दिला आहे.

Coronavirus Patient In Latur Health News

loading image