esakal | Coronavirus : शहागडमधील 26 जण लातूरच्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

दिल्लीतील मरकज येथून धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आंध्र प्रदेशकडे जाणारे हे 12 प्रवासी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील शहागड येथे एका कुटुंबाच्या घरी चहा-पाण्यासाठी थांबले होते. या ठिकाणी एकूण 26 जण त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली.

Coronavirus : शहागडमधील 26 जण लातूरच्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात

sakal_logo
By
महेश गायकवाड

जालना : लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात सापडलेल्या 12 परप्रांतीयांपैकी आठ जण कोरोनाग्रस्त आढळून आले. दरम्यान लातुरकडे जात असताना ते शहागड येथील तीन कुटुंबांच्या संपर्कात आले होते. या कुटुंबांतील 26 जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

शनिवारी (ता. ४) रात्री उघडकीस आलेल्या या घटनेनंतर शहागड परिसर शंभर टक्के सील करण्यात आला असून, राज्य राखीव दलाचे जवान परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

दिल्लीतील मरकज येथून धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आंध्र प्रदेशकडे जाणारे हे 12 प्रवासी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील शहागड येथे एका कुटुंबाच्या घरी चहा-पाण्यासाठी थांबले होते. या ठिकाणी एकूण 26 जण त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांना शनिवारी रात्री मिळाली. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

त्यांनी तातडीने तहसीलदार राजीव शिंदे व वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश देशमुख यांना याबाबत माहिती कळवून या 26 जणांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या सर्वांच्या लाळेचे नमुने घेऊन रविवारी (ता.पाच) पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

दिल्ली येथील मरकज मधील 12 जण दोन चारचाकी वाहनाद्वारे आले होते. गावातील एका कुटुंबाच्या घरी चहा पाण्यासाठी ते थांबले होते. चार कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- तारीख शेख, सरपंच, शहागड. 

loading image