लातूर महानगरपालिकेत कोरोना वॉर रुम, आरोग्य विभाग सतर्क

Latur Municipal Corporation, Coronavirus News
Latur Municipal Corporation, Coronavirus News

लातूर ः लातूरमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. परंतु प्रवासादरम्यान निलंगा येथे थांबलेल्या परराज्यातील १२ पैकी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी एका ही रुग्ण शहरातील रहिवाशी नसला महापालिका व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. महापालिकेत तर कोरोना वॉररुम तयार करण्यात आली आहे. सहायक आयुक्ताच्या नेतृत्वाखाली ही रुम सुरु राहणार आहे.


निलंगा येथे हरियाणाहून आलेले व तेलंगणा जाणारे बारांपैकी आठ जण शनिवारी (ता.चार) कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लातूर जिल्हा हादरला. गेल्या काही दिवसांपासून महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय-योजना करण्यात पुढाकार घेत आहे. त्यात आता आठ जण पॉझिटीव्ह आल्याने महापालिका सतर्क झाली आहे. तातडीने महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकात बिराजदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेत कोरोना वॉररुम स्थापन करण्यात आली आहे.


महानगरपालिका वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य आणि स्वच्छता विभागाने यापुढे अधिक कार्यक्षमतेने कार्यरत राहून लातूरकरांना कुठलीही असुविधा होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसेच मागील आठ दिवसांत महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ९२ हजार घरांमधून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची ही माहिती घेतली.


आठही कोरोना बाधित रुग्णांवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्रात उपचार केले जात आहेत. महापौर व उपमहापौर यांनी तेथील विलागीकरण परिसरात भेट देऊन सर्व व्यवस्था कार्यरत असल्याची खात्री केली. तसेच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याशी चर्चा करून महानगरपालिकेच्या वतीने करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा केली. तसेच वैद्यकीय केंद्र येथील सर्व परिसर येथे स्वच्छता व फवारणी करवून घेतली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे सर्व घडामोडींवर वैयक्तिक लक्ष देईन असून लातूरकरांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगावी असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. महापालिकेचे आठ आरोग्य केंद्र आहेत. तेथेही कोणी संशयित रुग्ण आला तर त्याच तातडीने प्राथमिक तपासणी करून पुढे संदर्भित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com