पाण्यासाठी सर्वसाधारण सभेतच नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : शहरातील पाणीप्रश्न गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाला असून, पाणीपुरवठ्याची छोटी-मोठी कामे देखील होत नसल्याने संतप्त भाजप, एमआयएम व काँग्रेस नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे आंदोलन करून महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे महापौरांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.

महापालिका शनिवारी (ता.20) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सुरुवात होतात सभागृहनेता विकास जैन यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असताना दुसरीकडे वॉर्डातील दूषित पाणी बंद करणे, नवीन पाइपलाइन टाकण्याची छोटी-मोठी कामे होत नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर नगरसेविका संतप्त झाल्या. प्रत्येकाने तक्रारीचा पाढा वाचला.

काही नगरसेवक आसनासमोर आल्याने त्यांना जागेवरुन बोलावे अशी सुचना महापौरांनी केली. त्यामुळे महापौर व नगरसेवक शाब्दिक चकमक उडाली. त्यात महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतर नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महापौर हाय हाय...पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Corporaters agitation for water in the general meeting of Aunrangabad Municipal corporation