नगरसेवक राजेंद्र जंजाळ, फेरोजखान यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - दंगलीत जाळपोळीला उत्तेजन दिल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ व एमआयएमचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते फेरोजखान यांना मंगळवारी (ता. १५) पोलिसांनी अटक केली. या वेळी कार्यकर्ते, नेत्यांनी जंजाळ यांचे घर व पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. तर फेरोजखान आधी पसार झाले होते, सायंकाळी ते सिटी चौक पोलिसांना शरण आले.  

राजेंद्र जंजाळ यांच्याविरुद्ध मोहम्मद शोएब अब्दुल मुनाफ (वय २८, रा. राजाबाजार) यांनी तक्रार दिली. अकरा मे रोजी रात्री नऊच्या सुमारास राजेंद्र हिंमतराव जंजाळ व त्यांचे सहकारी आले. त्यांनी मोहम्मद शोएब यांच्या कारची तोडफोड करून आत पेट्रोलच्या बाटल्या टाकल्या. त्यामुळे कारने पेट घेतला. अशाच प्रकारने त्यांनी आणखी वाहने व काही दुकानांवर पेटत्या बाटल्या फेकून जाळपोळ केली. यात संशयितांनी  ४२ लाख बारा हजारांची मालमत्ता पेटविल्याचा आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला. दंगलीचा एक व्हिडिओ समोर आला असून, यात संशयित जंजाळ जाळपोळ करताना दिसत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ४३५, ४३६ नुसार गुन्ह्याची नोंद झाली. 

दरम्यान, दंगलप्रकरणी एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोजखान यांच्यावर सिटी चौक ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. दंगेखोरांना उत्तेजन देऊन जाळपोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या अटकेसाठी एक पथक नवाबपुरा येथे गेले; परंतु ते घरी सापडले नाहीत. या प्रकरणात आमदार इम्तियाज जलील यांनी मध्यस्थी करून सायंकाळपर्यंत त्यांना हजर करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात फेरोजखान यांना हजर केले. 

फेरोजखान यांच्या घराची झडती
फेरोजखान यांना पकडण्यासाठी सकाळी साडेदहाला पोलिस पथक त्यांच्या नवाबपुऱ्यातील घरी धडकले. त्या वेळी फेरोजखान घरी नव्हते. पोलिसांनी त्यांच्या घराची चार तास झडती घेतली. यानंतर सायंकाळी फेरोजखान पोलिसांना शरण आले. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.

Web Title: Corporator Rajendra Janjal Ferozekhan arrested