औरंगाबाद : पाणीप्रश्नासोबतच खासदार जलील यांच्या अभिनंदनावरुनही सर्वसाधारण सभेत गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

  • पाणीप्रश्नावरून सर्वसाधारण सभेत गदारोळ
  • खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा मुद्दाही तापला
  • शेवटी पाच मिनिटांसाठी सर्वसाधारण सभा तहकूब 

औरंगाबाद : औरंगाबाद : सर्वसाधारण सभेत आज गुरुवारी (ता. 13) प्रचंड गदारोळ झाला. कुणी राजदंड पळवला तर कुणी सभापतींच्या बैठकीशेजारीच ठाण मांडले!

नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन व शहरातील पाणीप्रश्‍नावरून गुरुवारी (ता. 13) झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला.

सुरवातीला भाजप नगरसेवकांनी पाणीप्रश्नावरुन राजदंड पळवला. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी करत एमआयएम  पक्षाच्या नगरसेवकांनी देखील राजदंड पळवला. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या सहा नगरसेवकांचे एका दिवसासाठी नगरसेवक पद रद्द केले. सभागृहात गदारोळ सुरूच असल्यामुळे शेवटी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporators messed up at the general meeting of Aurangabad