लाचखोर उपजिल्हाधिकारी अखेर एसीबीला शरण 

file photo
file photo

नांदेड : बिलोलीचे तत्कालीन लाचखोर उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले अखेर लाचलुचपत प्रतिबंध विभागाला शरण आला. त्याने अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र जामीन मिळत नसल्याने अखेर तो गुरूवारी (ता. १९) एसीबीला शरण आला. त्याला शुक्रवारी (ता. २०) न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी सांगितले. 

बिलोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व नुकतीच भारतीय पोलिस सेवेत निवड झालेला अमोलसिंह भोसले याच्यावर बिलोली येथे लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात फसला होता. मात्र त्यावेळी त्या सापळ्यात त्याचे दोन खासगी व्यक्ती पकडले होते. येसगी आणि गोळेगाव वाळूघाटावर कारवाई करुन दोन हायवा ट्रक जप्त केले होते. हे दोन्ही ट्रक सोडण्यासाठी लाचखोर भोसले याने दोन लाखाची लाच मागितली होती. ती लाच देण्याचेही ठरले. मात्र तक्रारदाराने या प्रकरणात नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. 

सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही जामीन

या तक्रारीवरुन ता. ३१ आॅगस्ट २०१९ रोजी बिलोली नवीन बस्साथनक परिसरात लावलेल्या सापळ्यात श्री. भोसले याचे खासगी व्यक्ती शामकुमार भोनिंगा आणि श्रीनिवास जीनकला दोघे राहणार हैद्राबाद यांना अटक केली होती. श्री भोसले याच्या सांगण्यावरुन या दोघांनी दोन लाखाची लाच स्विकारली होती. मात्र उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले हा फरार झाला होता. त्याने अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले मात्र त्याला जामीन मिळु नये म्हणून पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी जामीन मिळू दिला नाही. 

अखेर अमोलसिंह भोसले शरण

आपली अटकेपासून सुटका नाही हे समजल्यानंतर अमोलसिंह भोसले हा गुरूवारी (ता. १९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागात शरण आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तपासीक अधिकारी पोलिस निरीक्षक राहूल पखाले यांनी गुरूवारी (ता. १९) दुपारी न्यायालयात हजर केले. मात्र कोरोनाच्या सावटामुळे न्यायालयीन कामकाज बदलल्यामुळे त्याची सुनावणी शुक्रवारी (ता. २०) होणार आहे. 
विशेष म्हणजे अमोलसिंह भोसले याची भारतीय पोलिस सेवेत निवड झाली होती. व दोन दिवसानंतर त्याला हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेण्यासाठी हजर व्हायचे होते. मात्र त्याच्या लाचखोरीमुळे नशिब फिरले आणि त्याला लाचेच्या जाळ्यात अडकावे लागले. 

धान्य घोटाळ्यातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर फरारच

कृष्णुर (ता. नायगाव) येथील मेगा ॲग्रो या कंपनीतील धान्य घोटाळ्यात अडकलेला तत्कालीन पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हा अद्याप सीआयडीच्या तावडीत आला नाही. या प्रकरणातील अटक केलेल्या आठजणापैकी फक्त मुख्य आरोपी अजय बाहेती याला चार कोटीच्या जामीनावर उच्च न्यायालयाने सोडले आहे. अजून सातजण हर्सुल कारागृहात मुक्कामी आहेत. वेणीकर याच्या हालचालीवर सीआयडी लक्ष ठेवून आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com