लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याला 4 वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कौडगाव MIDC मध्ये संपादित केलेल्या जमिनीचा मावेजाचा धनादेश देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला लाच मागितली होती.

उस्मानाबाद- लाच घेतल्या प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा उपाविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना 4 वर्षाची दुहेरी शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

राऊत यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. कौडगाव MIDC मध्ये संपादित केलेल्या जमिनीचा मावेजाचा धनादेश देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला लाच मागितली होती. राऊत यांनी 39 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने केली होती. 

पीडित शेतकऱ्याने फिर्याद दिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB) पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यावर न्यायालयाने आज (सोमवार) निकाल सुनावला. 
 

Web Title: corrupt deputy collector sentenced 4 years jail