विनाशुल्कला भ्रष्टाचाराचे ग्रहण; महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील प्रकार

बाळासाहेब लोणे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

शासनातर्फे विनाशुल्क आधार कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी फक्त पंचवीस रुपये नाममात्र शुल्क व जीएसटी असे तीस रुपये शुल्क आकारण्यात यावे अशा स्पष्ट सूचना आहेत.

गंगापुर : येथील आधार केंद्रावर आधार कार्ड अद्यावतीकरणात ग्राहकांची लूट सुरू असून अद्यावत करण्यासाठी 80 रुपये आकारले जात आहेत. शहरात दोन केंद्रावर आधार कार्ड काढण्याची व आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

नवीन आधार कार्ड ग्राहकाला मोफत असून बोटाचे ठसे व नावात चुकी अद्यावत करण्यासाठी नियमाने तीस रुपये अशी फिस आकारली जाते. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असून येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील आधार केंद्रात 80 रुपये उकळले जात आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्राहकांनी जिलहधकरी उदय चौधरी यांच्याकडे धाव घेतली आहे. संबधित केंद्रावर कारवाई करून केंद्र रद्द करण्याची मागणी होत आहे. शासनातर्फे विनाशुल्क आधार कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी फक्त पंचवीस रुपये नाममात्र शुल्क व जीएसटी असे तीस रुपये शुल्क आकारण्यात यावे अशा स्पष्ट सूचना आहेत. शहरासह ग्रामीण भागातील गावे, वाडी वस्ती व तांड्याती हजारो नागरिकांसाठी मोफत आधार नोंदणी सेवा ही दिलासादायक बाब असली तरीही केंद्र चालकांकडून सुरू असलेल्या लुटीला ग्राहक वैतागले आहेत. ग्रामीण भागात आधार कार्ड काढण्यासाठी जास्त शुल्क आकारले जात असल्यामुळे जाब कोणाला विचारावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील केंद्र चालकाला विचारले असता मी इथे  कामाला आहे, मालकाने सांगीतलेली रक्कम एमएलए घ्यावी लागते, नियमाने किती फिस घ्यावी याविषयी मला माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

मी माझ्या मुलाचे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी गेलो असता, सदरील केंद्र चालकाने मला झेरॉक्स दुकानातून साठ रुपयाचा अर्ज आणायला सांगतीला, झेरॉक्स दुकानदार त्यावर नंबर टाकून देतो, तोच अर्ज इथे स्वीकारला जातो. त्यानंतर अद्यावत करण्यासाठी वीस रूपये फिस आकारली गेली.  येथील केंद्रावर मोठी लूट सुरू आहे. - संजय करमुडकर (शिक्षक, ठोळे माध्यमिक विद्यालय, वरखेड)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: corruption in Maharashtra Grameen Bank gangapur