esakal | कापूस अन् तुरीला पीकविमा नाही; श्रेय कोण घेणार - आमदार विनायक मेटे
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांचा कापूस अन् तूर वाया गेली होती. तरीही या दोन पिकांना विमा भेटला नाही. न भेटलेल्या पीकविम्याचे श्रेय कोण घेणार, असा टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. 

कापूस अन् तुरीला पीकविमा नाही; श्रेय कोण घेणार - आमदार विनायक मेटे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - गतवर्षी बीड तालुक्यामध्ये सुरवातीच्या काळात पाऊस झाला नाही. पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांचा कापूस अन् तूर वाया गेली होती. तरीही या दोन पिकांना विमा भेटला नाही. न भेटलेल्या पीकविम्याचे श्रेय कोण घेणार, असा टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. 

मागच्या वर्षी थोडाफार आलेला कापूस व तुरीचे नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. तरीही विमा कंपनीला शेतकऱ्यांचे नुकसान कसे दिसले नाही? असा सवालही श्री. मेटे यांनी केला. पीकविमा मिळाल्याचे श्रेय लाटणारे पीकविमा नाही मिळाल्याचे देखील श्रेय घेतील का? असा सवालही त्यांनी केला. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

तालुक्यात यंदा कापूस व तुरीचा विमा कोणत्याच मंडळास मंजूर झालेला नाही. एकाच वेळी सर्वच मंडळांत कापूस अन् तूर चांगली आल्याचा जावईशोध जर विमा कंपनी लावत असेल तर सत्ताधारी महाविकास आघाडीने याबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळवून द्यायला काय हरकत आहे? पीकविमा आल्यानंतर कोट्यवधींचे आकडे टाकून श्रेय घेणारे नाही आल्याचा देखील श्रेय घेतील का? पीकविमा न मिळणे हे शेतकऱ्यांचे दुर्दैव व सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.