परभणी : कपाशीला फुटले झाडावरच कोंब

कैलास चव्हाण
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. सोयाबीन जागेवरच खराब होत असताना आता कपाशीदेखील झाडावरच कोंब फुटले आहेत.

परभणी : परतीच्या पावसानंतर सुरु झालेला मॉन्सुनोत्तर पाऊस थांबायचे नाव घेत नसून चार दिवसांपासून झोडपून काढणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. सोयाबीन जागेवरच खराब होत असताना आता कपाशीदेखील झाडावरच कोंब फुटले आहेत.

सध्या सर्वत्र सोयाबीन कापणीची आणि कपाशी वेचणीची घाई असताना पावसाने धुमाकुळ घालत पिकांची दाणादाण उडवली आहे. हाताशी आलेला घास हिरावून नेला आहे. अनेकांनी कापणी करुन ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याखाली आता पाणी गेले असून, उभ्या पिकांसह शेतात कापणी करुन जमा न केलेले पिक वाहून गेले आहे. परभणीत सातत्याने चौथ्या रात्रीही दमदार पाऊस झाला आहे.

यामुळे वेचणीला आलेल्या कपाशीला झाडावरच फुटलेल्या कापसातून कोम बाहेर यायला लागले आहेत.सध्या शेतात अनेक पिका पाण्याखाली गेली असून रब्बी हंगामातील पेरणीला फटका बसला आहे. दिवाळीच्या तोंडावर तोडणीला आलेल्या झेंडूसह अन्य फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

परभणी, सेलू, गंगाखेड या तालुक्यातील नुकसानीची तिव्रता अधिक आहे. आतापर्यत जिल्ह्यात 680.92 मिलीमिटर पाऊस झाला असून, वार्षीक सरासरीच्या 87 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान बुधवारी सकाळी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton loss in Parbhani district