जगभरातील तज्ञांच्या उपस्थितीत टेस्ट ट्यूब बेबीवर औरंगाबादेत मंथन 

अनिलकुमार जमधडे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबादेत पहिल्यांदाच वंध्यत्व व टेस्ट ट्यूब बेबी या विषयावर परिषद होत आहे. यात आयव्हीएफच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्रीच्या मानकरी ठरलेल्या डॉ. कामिनी राव, डॉ. इंदिरा हिंदुजा आणि डॉ. अलका क्रिपलानी यांची यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

औरंगाबाद : आयव्हीएफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीच्या क्षेत्रातील नवीन प्रवाह, तंत्रज्ञान, अडचणी, शासनाच्या विविध योजना याबाबत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी औरंगाबादेत प्रथमच जगभरातील तज्ञांच्या उपस्थितीत तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही परिषद होत असल्याची माहिती परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राज बोलधने यांनी दिली. 

औरंगाबादेत पहिल्यांदाच वंध्यत्व व टेस्ट ट्यूब बेबी या विषयावर परिषद होत आहे. यात आयव्हीएफच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्रीच्या मानकरी ठरलेल्या डॉ. कामिनी राव, डॉ. इंदिरा हिंदुजा आणि डॉ. अलका क्रिपलानी यांची यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ. ऋषिकेश पै, डॉ. सतीश पत्की, डॉ. अमित पत्की, डॉ. फिरोज पारिक यासारखे भारतातील दिग्गज टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ या परिषदेला मार्गदर्शन करतील. बॉलिवूड स्टार करिष्मा कपूर याप्रसंगी 'बेटी बचाओ' मोहिमेची माहिती देतील. आयएसएआरच्या अध्यक्षा डॉ. रिश्‍मा पै-ढिल्लन आणि राजीव गांधी आरोग्य योजनेचे राज्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे परिषदेत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Council in Aurangabad about test tube baby in the presence of experts around the world