सततच्या पावसामुळे ऊस आडवे, मूग पाण्यात तर सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव

Rain Damaged Crops Jalkot News
Rain Damaged Crops Jalkot News

जळकोट (जि.लातूर) : तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. हाताला आलेल्या मूगला मोड फुटत आहे. पावसामुळे जमीन भुसभुसीत झाल्याने उभा ऊस आडवा पडला आहे. सोयाबीन पिकावर आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. तालुक्यात पाच दिवसापासून कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस चालू आहे. शेतकऱ्यांना गेल्या पाच दिवसापासून शेतीचे दर्शन झाले नाही.

मूग काढणीला आला आहे. राशीच्या तोडालाच पाऊस झोडपत आहे. पावसामुळे शेतीला तलावाचे स्वरुप आले आहे. हाताला आलेला मूग पाण्यामुळे नासाडी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान तालुक्यात यावर्षी दोन हजार हेक्टर ऊसाची लागवड झाली आहे. ऊस सध्या दहा ते बारा काड्यावर आला आला आहे. ऊसाची उंची वाढल्याने व सतत पाऊस होत असल्याने जमीन भुसभुसीत झाली आहे. पावसाबरोबर वारा असल्याने उभे ऊस चक्क आडवे पडले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा आहे. सोयाबीन कबरेला आले आहे. सतत पडत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांना फवारणी सुद्धा करत येत नाही. पावसाने साठवण, पाझर तलाव, नदी, नाले भरून वाहत असले तरी खरिपातील मूग, सोयाबीन, ऊसावर पावसामुळे संकट आले आहे. असाच पाऊस तीन-चार दिवस राहिल्यास शेतकऱ्यांच्या हातातून मूगाचे पिक जाणार असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

मुरूडच्या धर्तीवर यंदा जळकोटात सार्वजनिक गणेशोत्सव नाही
लातूर जिल्हाच्या टोकावर असलेले जळकोट (जि.लातूर) शहरात कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळानी हा निर्णय घेतला असून गणेशोत्सवा ऎवजी कल्पनाला रोखण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जळकोट नंगरपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी (ता.२०) पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या संकटात जळकोट शहरातील सार्वजनिक गणेश मंडळानी टाकलेले पाऊल सर्वासाठी प्रेरणादायी  ठरले आहे. गावात अधिकृत परवानगी घेऊन नऊ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणेशमुर्तीची स्थापना करण्यात येते. सर्व मंडळाकडून विविध देखावे करण्यात येतात. यासह मिरवणुका व अन्य उपक्रमासाठी लाखो रूपये खर्च करतात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सावर मर्यादा आल्या आहेत. जळकोट पोलिस ठाणे, नगरपंचायतीकडून गुरुवारी गणेश मंडळाचे पदाधिकारी व अन्य घटकांची बैठक घेण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता.

शहरात एकही गणेश मंडळाची स्थापना न करण्याचा निर्णय बैठकीत सर्वाचे एकमत झाले. यावेळी तहसीलदार संदीप कुलकर्णी, पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, मुख्याधिकारी स्वामी, नगराध्यक्ष किसन धुळशेट्टे, नगरसेवक महेश धुळशेट्टे, गोविंद भ्रमण्णा, धनजंय भ्रमण्णा, शाम डांगे, अक्षय काळे, पोलिस कर्मचारी गणेश माळवदे यांच्यासह  शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, विविध पक्षाचे अध्यक्ष उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com