हातभट्टी दारू बनविण्याचे रसायन जप्त

चित्र
चित्र

खुलताबाद (जि.औरंगाबाद ) ः आखातवाडा तांडा (ता. खुलताबाद) येथील घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्याने मंगळवारी (ता. दहा) सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अकरा हजारांचे गावठी हातभट्टीचे रसायन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस नाईक वाल्मीक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात मोहन नूरचंद चव्हाण, रा. आखातवाडा तांडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आखातवाडा तांडा येथे मोहन चव्हाण हा आपल्या घराच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे पथक दोन पंचांना घेऊन पायी चव्हाण यांच्या घरी पोचले. पत्र्याच्या शेडमध्ये रसायन उकळणे सुरू होते. याच ठिकाणी लोखंडी पत्र्याच्या नऊ डब्यांमध्ये एकूण 180 लिटर रसायन भरलेले होते. अंदाजे दहा हजार आठशे रुपयांचे हे रसायन जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी नीलकंठ देवरे, वाल्मीक कांबळे यांनी ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com