'मी तर कशाला जगू' म्हणून पत्नीनंतर पतीचीही आत्महत्या 

सुधाकर दहिफळे
गुरुवार, 5 जुलै 2018

रेणापूर - पत्नीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या पाहिल्यानंतर जावयाने सासरा व नातेवाईकांशी मोबाईलवर संपर्क साधून 'मी तर आता कशाला जगु'  म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. घनसरगाव ता.रेणापूर येथे बुधवारी (ता. 4) रात्री ११ वाजता ही घटना घडली.     

रेणापूर - पत्नीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या पाहिल्यानंतर जावयाने सासरा व नातेवाईकांशी मोबाईलवर संपर्क साधून 'मी तर आता कशाला जगु'  म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. घनसरगाव ता.रेणापूर येथे बुधवारी (ता. 4) रात्री ११ वाजता ही घटना घडली.     

याबाबत रेणापूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की घनसरगाव येथील संदीपान प्रभाकर गिरी, वय ४८ वर्ष  व सरोजा संदीपान गिरी, वय ३२ वर्ष हे पती पत्नी घनसरगाव ता.रेणापुर येथे आपले राहते घरी बुधवारी ता. ४ संध्याकाळी झोपल्यानंतर पत्नी सरोजा गिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पती संदीपान गिरी हा संध्याकाळी अकरा वाजता झोपेतून जागी झाल्यानंतर त्याने पत्नीने गळफास घेतल्याचे व ती मृत झाल्याचे पाहिले. यानंतर संदीपान याने सासरे यांना मोबाईलवर संपर्क साधून तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मी तरी आता कशाला जगु असे सांगीतले याबरोबरच ही घटना संदीपान यांनी त्यांच्या जावयाला ही सांगीतली सर्वांनी संदीपान यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु संदीपान यांनी कोणाचेही न ऐकता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत  शाम चंद्रकांत गिरी यांनी  रेणापुर पोलीस ठाण्यात फिर्याद  दिल्यावरुण आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सोमवंशी हे करित आहेत.

दिलदार स्वभावाचा माणूस 
संदीपान गिरी हे एस.टी.महामंडळात वाहक म्हणून नौकरीस होते. व गत सहा दिवसापुर्वी त्यांना पद्दोन्नती मिळून ते वाहतूक नियंत्रक झाले होते.वाहतूक नियंत्रक म्हणून केवळ तीनच दिवस त्यांनी लातूर बसस्थानकात सेवा केली.एक मनमिळावू व दिलदार स्वभावाचा माणुस म्हणून त्यांची लातूर आगारात ओळख होती. संदिपान गिरी यांची पहिली पत्नी कँन्सर मुळे  वारल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले होते.पहिल्या पत्नीस तीन मुली व एक मुलगा आहे मुलगा अकरावीला आहे  तर एक मुलगी  कँन्सरनेच मृत्यू पावली आहे. दुसऱ्या पत्नीस एक मुलगा आहे तो चौथीच्या वर्गात शिकतो आहे.दोन्ही मुलीचे विवाह झाले आहेत.

Web Title: couple suicide crime