झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

हिंगोली : औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील गोकर्ण माळरानावर प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. सात) उघडकीस आली. 

हिंगोली : औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील गोकर्ण माळरानावर प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. सात) उघडकीस आली. 

गोकर्ण माळरानावर काही मजूर गवत कापणीसाठी गेले होते. दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली असता झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला. मजुरांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना, तर अधिकाऱ्यांनी औंढा पोलिसांना माहिती दिली. सहायक निरीक्षक सय्यद आजम, उपनिरीक्षक राहुल तायडे, वनपरिमंडळ अधिकारी जयश्री बर्गे, वनरक्षक एस. एस. चव्हाण, भीमराव चिंतारे आदींनी पाहणी केली. झाडाखाली काचेची बाटली, बॅग सापडली. बॅगच्या तपासणीत गजानन विठ्ठल कुरुडे (रा. गवळेवाडी) असे नाव आढळले. मुलीचे नाव ध्रुपता कुंडलिक लिंबाळकर (रा. दरेगाव) असे असल्याचे तिच्या महाविद्यालयातील ओळखपत्रावरून कळले.

दोघांचे नातेवाईक घटनास्थळी धाव घेत ओळख पटवली. ध्रुपता लिंबाळकर ही औंढा येथील महाविद्यालयात बारावीत शिकत होती; तर गजानन कुरुडे हा नापास झाला होता. त्यांचे महाविद्यालयात असताना प्रेमसंबंध होते. मागील तीन ते चार दिवसांपासून ते बेपत्ता होते; मात्र तशी तक्रार केलेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Couple suicide with hanging on tree

टॅग्स